crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

आत्महत्येस प्रवृत्ती केल्याप्रकरणी तरुणास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर:-ॲड.रितेश थोबडे

 

सोलापूर

अभिजीत दिलीप दिवे वय 25 महादेववाडी ता माढा जिल्हा सोलापूर यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी योगेश तानाजी सोनवर रा महादेव वाडी ता माढा जि सोलापूर यास कोल्हापूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरोज पठाण यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

या हकीकत अशी की, यातील फिर्यादी लक्ष्मी दिलीप दिवे हिस अभिजीत व गणेश ही दोन मुले होती व त्यांची स्वतःची दुध डेअरी होती. घटने दिवशी डेयरीवरती मयत अभिजित लोकांचे दूध गोळा करून सकाळी ९ वाजता घरी आला होता. तो मोटरसायकल वरती दुपारी ऊसाचे वाडे आणण्याकरिता गेला होता. वाडे घेऊन तो घरी आल्यानंतर त्याने सांगितले की, योगेश तानाजी सोनवर याने मला रस्त्यामध्ये अडवून पैसे दे नाहीतर तुला जीवे ठार मारीन असे म्हणाला होता. त्यावर मयत अभिजीत याने लहान भाऊ गणेश हा कामावरून आल्यावर काय असेल तो पैशाचा व्यवहार मिटवू असे म्हणाला होता. त्यानंतर मयत अभिजीत हा पाच वाजेच्या सुमारास दोरी घेऊन शेतात गेला होता.

 

 

 

 

साधारण सहा वाजेच्या सुमारास भाऊकीतील लोकांकडून अभिजीत याने माणिक दिवे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असे समजले. त्यावरून मयत अभिजीत याची आई लक्ष्मी हिने अर्जदार योगेश तानाजी सोनवर याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
त्यावर आपणास अटक होऊ नये म्हणून योगेश याने सत्र न्यायालय बार्शी येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.

 

 

 

 

त्यावर योगेश याने ॲड रितेश थोबडे यांच्यामार्फत कोल्हापूर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता.

अर्जाच्या सुनावणीच्या वेळी ॲड.रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात केवळ अर्जदाराने दिलेल्या पैशाची मागणी केली म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केले असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायमूर्तींनी अर्जदार आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 

 

यात अर्जदार आरोपीतर्फे ॲड.रितेश थोबडे,ॲड निखिल पाटील यांनी तर सरकारतर्फे ॲड.श्रीकांत यादव यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia