crimeindia- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

भीमातीर येथील ६ जणांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी महेश तळवार याला गोळी झाडून पोलिसांनी केली अटक

विजयपूर / दिपक शिंत्रे

 

विजयपूर,
भीमातीर येथे झालेल्या सहा जणांच्या सामूहिक हत्याकांडातील मुख्य आरोपी महेश तळवार याला अटक करताना पोलिसांनी त्याच्या पायात गोळी झाडून ताब्यात घेतले.
तिकोटा तालुक्यातील इट्टंगीहाळ गावाच्या बाहेरील भागात आरोपी महेश तळवार याला पकडण्यासाठी चडचण पोलिस गेले असता, त्याने पोलिसांवर दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी आत्मसंरक्षण आणि आरोपीला पकडण्याच्या उद्देशाने चडचणचे सीपीआय परशुराम मनगुळी यांनी महेशच्या उजव्या पायावर गोळी झाडली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

 

 

 

या घटनेत पोलीस कर्मचारी शेखर पवार आणि विजयकुमार बनसोडे जखमी झाले असून, दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. जखमी आरोपी महेश तळवार याच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेल्या २९ मे रोजी चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावाजवळील शेतात निराळे कुटुंबातील पाच जणांसह एकूण सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभर मोठी खळबळ उडाली होती.

 

 

प्राथमिक तपासानुसार, ही हत्या करण्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांची सुपारी घेतलेल्या महेश तळवारने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याचा संशय आहे. घटनेनंतर तब्बल २३ दिवस पोलिसांना चकवा देणारा हा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक (एसपी) लक्ष्मण निंबरगी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia