maharashtrapoliticalsocialsolapur

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकीची परंपरा !…

बिडी कामगार ४० महिलांना अन्नधान्य किट देऊन ९ वा वर्धापन दिन साजरा....

 

सोलापूर :

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने नव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता शहरातील बिडी कामगार व कारखान्यातील ४० महिलांना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने गेल्या ९ वर्षात गरिब, निराधार व झोपडपट्टी, कामगार वसाहतीत राहणाऱ्या लोकांना व रेल्वे स्टेशनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना, अपंग व अंध, एच आय व्ही.बाधीत असे विविध घटकांना अन्नधान्य वाटप करून वर्धापनदिन साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम राखली. यावर्षी सुनिल नगर येथील विठ्ठल नगर एमआयडीसी येथे मान्यवरांच्या हस्ते ४० महिलांना गहू, ज्वारी, साखर, तांदूळ, व चनादाळ प्रत्येकी दोन किलो असे एकूण दहा किलोचे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गणपा, युवा उद्योजक आनंद वंगा, अनुभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाईकट्टी, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते. सोलापुरातील दानशूर व्यक्तीच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे महिला कामगार यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून आले.

सुत्रसंचालन ओम मिस्कीन यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षता कासट यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनुश्री कासट, शामकुमार मुळे, श्रीकांत गायकवाड, संजय चिल्का, दिपक करकी, राजेश केकडे, अभिजीत व्हानकळस, ओम मिस्किन, नागनाथ बिल्ला, अदित्य शिरगे, समर्थ सवरागी, सिद्धार्थ दंडवते आदींनी परिश्रम घेतले.

चौकट :
९ वर्षात विविध सामाजिक
उपक्रम राबविले : महेश कासट

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान गेल्या ८ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येते. 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, कम्पासपेटी व प्रश्नपत्रिका मोफत वाटप करण्यात आले. वृक्षारोपन, रक्षाबंधन, गुढीपाडवा निमित्त साडी वाटप, विविध स्पर्धा घेतल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात येते, असे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button