crimemaharashtrapoliticalsocialsolapur

कलम 163 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मतमोजणी कालावधीत विविध साहित्य, शस्त्र, वाहन व व्यक्तींच्या प्रवेशावर निर्बंध…

कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात...

 

सोलापूर

दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी मा. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 साठी कार्यक्रम घोषीत केला आहे. सदर दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.
दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 08.00 वा. पासून तीनही विधानसभा मतदार संघाची मतमोजणी खाली नमुद ठिकाणी सुरु होणार आहे. त्यानुसार मतमोजणी प्रक्रिया शांततेत, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून मतमोजणीचा संपूर्ण परिसर व त्या लगतचे 100 मीटर परिसरात विविध साहित्य, शस्त्र बाळगण्यास, वाहनांचे आणि व्यक्तींच्या प्रवेशास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघ -मतमोजणीचे ठिकाण -एन.बी. नवले, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव, सोलापूर
249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघ- मतमोजणीचे ठिकाण -नुतन मराठी विद्यालय, हरीभाई देवकरण प्रशालाजवळ, होम मैदान समोर, डफरीन चौक, सोलापूर
251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघ- मतमोजणीचे ठिकाण -बहुउद्देशीय सभागृह, राज्य राखीव पोलीस बल गट क्रं.10, सोरेगांव, सोलापूर

पोलीस आयुक्त, सोलापूर शहर एम. राज कुमार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 नुसार प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, वर नमुद प्रमाणे तीनही विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी ठिकाणाचे परिसर व त्या लगतचे 100 मिटर परिसरात खालील कृती करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे.
वर नमुद तीनही विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी इमारतीचे आतील संपूर्ण परिसरात मोबाईल, टॅब्लेट, संगणक व तत्सम संदेशाची देवाण-घेवाण करणारी विद्युत उपकरणे आणण्यास / वापरण्यास / हाताळण्यास प्रतिबंध असेल.
वर नमुद तीनही विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी इमारतीमध्ये तंबाखुजन्य पदार्थ, आगपेटी, लायटर, ज्वालाग्रही पदार्थ अथवा कोणतेही घातक पदार्थ किंवा वस्तु घेवुन प्रवेश करणे.
वर नमुद तीनही विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी केंद्राचे परिसरात निवडणूक विषयक अधिकारी / कर्मचारी, उमेदवार, उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक कार्यालयाकडून दिलेल्या ओळखपत्रधारक व्यक्ती यांचेशिवाय इतर व्यक्ती यांनी मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करणे.
कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन वर नमुद तीनही विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करणे.
सोलापूर जिल्हा निवडणूक कार्यालय अथवा संबंधीत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाकडुन दिलेल्या वाहन परवानाशिवाय इतर वाहनांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश करणे.
पत्रकार व माध्यम प्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष मतमोजणी कक्षामध्ये मोबाईल व कॅमेरासह प्रवेश करणे,
सदर बंदी आदेश निवडणुक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी कर्मचारीवृंद ,बंदोबस्तकामी तैनात असलेले सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार , राज्य व केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान यांना लागू असणार नाही.
या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता,2023 चे कलम 223 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल, हा बंदी आदेश दि 23 नोव्हेंबर 2024 रोजी 5 वा. पासुन मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहिल असे आदेश पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम. राज कुमार यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button