लिंगायत नेतृत्वाला मिळाला न्याय पक्ष श्रेष्ठींनी घेतली दखल थेट या नेत्याची काँग्रेस च्या प्रदेश सेक्रेटरी पदी निवड…
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे,विश्वजित कदम यांनी राहुल वर्धा यांना दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...
सोलापूर
काँग्रेस पार्टीचे एकनिष्ठ नेते म्हणून राहुल वर्धा यांची सर्वपरिचित ओळख आहे. राहुल वर्धा यांनी २००६ पासून NSUI च्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरुवात केली .राहुल वर्धा यांना रोहितजी टिळक यांच्या नेतृत्वात २००६ ते २०१० पर्यंत प्रदेश सरचिटणीस ते विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून काम करण्याची सुवर्ण संधी मिळाली.त्या संधीचे पक्ष संघटन वाढीसाठी व पक्ष श्रेष्ठी चे हात बळकट करण्यासाठी राहुल वर्धा यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले.
२०११ मध्ये सोलापूर लोकसभा युवक काँग्रेस मध्ये सरचिटणीस व शहर मध्य चे निरीक्षक पदावर राहुल वर्धा यांनी उत्कृष्ट कार्य केले.२०१४ साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या निवडणुकीमध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले व राहुल वर्धा यांची प्रदेश सरचिटणीस पदी बहुमताने निवड झाली.
त्यांचे कार्य कौशल्याचे वैयक्तिक दखल घेत खासदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रदेश अध्यक्षांकडे वर्धा यांची प्रदेश वर वर्णी लागण्यासाठी विशेष शिफारस केली.
यानंतर प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या पहिल्या यादीत पक्षातील अंतर्गत कारणामुळे वर्धा यांना न्याय मिळाला नाही.
प्रदेशवर निवड न झाल्यामुळे नाराज न होता खासदार प्रणिती शिंदे व केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत राहुल वर्धा हे एकनिष्ठ राहिले.प्रामाणिकपणे त्यांनी आपले कार्य अधिक जोमाने सुरू ठेवले. निस्वार्थी पणा ,एकनिष्ठ , आणि आजतागायत पार पडलेल्या विविध निवडणुकांच्या विजयात राहुल वर्धा यांचा सिंहाचा वाटा असल्याने पुनश्च: खासदार प्रणिती शिंदे व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे राहुल वर्धा यांची प्रदेशवर वर्णी लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
आणि अखेर राहुल वर्धा यांना न्याय मिळालाच .आणि राहुल वर्धा यांची काँग्रेस च्या प्रदेश सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली.काँग्रेस मध्ये एकनिष्ठ राहून ,प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतोच हे राहुल वर्धा यांच्या माध्यमातून सिद्ध झाले.शहर उत्तर मधून लिंगायत समाजातील नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल नुतून प्रदेश सेक्रेटरी राहुल वर्धा यांनी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी ,माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे यांचे विशेष आभार प्रकट केले.या निवड प्रक्रियेबद्दल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे,खासदार प्रणिती शिंदे, यांच्यासह पक्षातील सर्वच प्रमुख नेते पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी राहुल वर्धा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.माजी मंत्री विश्वजित कदम हे युवक प्रदेश अध्यक्ष असताना राहुल वर्धा यांच्यावर कोल्हापूर , माढा, धाराशिव लोकसभेचे निरीक्षक म्हणून विश्वासाने मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती.याही मिळालेल्या संधीचे राहुल वर्धा यांनी अथक परिश्रम घेऊन सोनेच केले .
त्यामुळे स्व.सातव व माजी मंत्री कदम यांनी राहुल वर्धा यांना कर्नाटक ,मध्य प्रदेश , गोवा , गुजरात च्या विधासभा निवडणुकीत राहुल वर्धा यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.२०१७ साली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाकडून राहुल वर्धा यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली.खासदार प्रणिती शिंदे यांनी राहुल वर्धा यांच्या कार्याची दखल घेऊन २०२४ च्या लोकसभेला मोहोळ विधानसभे मध्ये समन्वयक म्हणून राहुल वर्धा यांना काम करण्याची संधी मिळाली.राहुल वर्धा यांची सोलापुरात एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून विशेष नाव लौकीक आहे.सामाजिक कार्यामध्ये राहुल वर्धा नेहमी अग्रेसर असल्याने त्यांची जनमानसात विशेष लोकप्रियता आहे.
राहुल वर्धा यांची प्रदेश सेक्रेटरी पदावर नियुक्ती झाल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे,माजी मंत्री विश्वजीत कदम,माजी आमदार प्रकाश यलगुलवार,धर्मराज काडादी,चेतन नरोटे ,राष्ट्रवादीचे महेश कोठे यांनी वर्धा यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या…..