crimemaharashtrapoliticalsocialsolapur

ब्रेकिंग:-अवैध ढाब्यांवर केलेल्या कारवाईत ढाबा चालक व मद्यपी यांना रुपये ४,३०,०००/- दंड राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका…

आचारसंहिता कालावधीमध्ये या विभागाकडुन अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणा-या मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा होटगी रोड, जयभवानी ढाबा मंगळवेढा रोड, सावजी कोड्रिंक्स कन्ना चौक, तसेच पंढरपुर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा तारापूर ता. माढा येथील राणा ढाबा, माळशिरस येथील सावनी ढाबा, शिवनेरी टाकळी सिकंदर ता. मोहोळ, हॉटेल सावली भोगाव ता.उ. सोलापूर, शुभम ढाबा सांगोला ता. सांगोला, जय भवानी ढाबा बेलाटी ता.उ. सोलापूर या १४ ढाब्यांवरती कारवाई करुन ब्रीथ् अॅनलायझर चा वापर करुन वैदयकीय चाचणी नंतर १४ ढाबा मालक व ३५ मद्यपी ग्राहकांना मा. न्यायालायासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रुपये २५०००/- व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये ३०००/- इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून एकुण रु.४,३०,०००/- इतका दंड जमा करुन घेण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढेही अशीच चालू राहणार आहे. परवाना नसणाऱ्या ठिकाणी मदय प्राशन केल्याने संबंधित जागा मालक व मदयपी या दोघांवर कारवाई होऊ शकते याची नोंद संबंधितानी घ्यावी.

शहर व जिल्हयामध्ये कोरड्या दिवसाच्या पार्श्वभुमीवर दि.१९/११/२०२४ रोजी केलेल्या कारवाईत एकुण २३ गुन्हे नोंद करुन २५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये अवैध देशी विदेशी मद्य वाहतुकीवर व विक्रीवर कारवाई करुन अवैध हातभट्टी दारु २३५ ली., देशीमद्य ४९८ ब.ली., विदेशी मद्य १२२ ब.ली., बिअर २१७ ब.ली., व १ चारचाकी वाहन व ५ मोटारसायकलसह असा एकुण रुपये ९,८७,५९४/- चा प्रोव्हीबिशन गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आचारसंहिता कालावधीमध्ये दि. १५/१०/२०२४ ते दि.१९/११/२०२४ या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकुण ३६२ गुन्हे नोद करण्यात आले असुन ३५४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कालावधीत केलेल्या कारवाईत १,०३,३३० ली. गुळमिश्रित रसायन, ९५२९ ली. हातभट्टी दारु, १८७१ ली., ताडी १७६४ ब.ली., देशी दारू १७६४ ब.ली., विदेशी दारु ८१५ब.ली.२८३ बिअर व ७३ वाहनासह एकुण १,७४,४०,६९४/- इतका मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई निरीक्षक श्री. आर. एम. चवरे, श्री जे. एन पाटील, श्री ओ व्ही घाटगे, श्री पंकज कुंभार, श्री भवड, तसेच दुय्यम निरीक्षक श्री एस डी कांबळे, श्री आर एम कोलते, श्री धनाजी पोवार, श्री समाधान शेळके, श्री सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. मुकेश चव्हाण, श्री मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इसमाईल गोडीकट, कपील स्वामी, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीरज तोग्गी, तानाजी जाधव, रेवणसिध्द कांबळे वाहनचालक रशीद शेख, दिपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली..

 

अवैध मद्यविक्री. अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button