maharashtrapoliticalsocialsolapur

पामलोर समाजाचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा…

 

सोलापूर : प्रतिनिधी

शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना पामलोर समाजाने सोमवारी पाठिंबा जाहीर केला. मोनिका कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समाजाच्या मान्यवरांच्या बैठकीत देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला.

यावेळी मोनिका कोठे म्हणाल्या, पामलोर समाज आणि शहराचा विकास याचे वेगळे समीकरण आहे. पामलोर समाजाच्या अनेक मान्यवरांनी सोलापूर शहराच्या विकासासाठी अनेक दशकांपासून आपले योगदान दिले आहे. पामलोर समाजाचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा मिळाल्यामुळे देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे, असेही मोनिका कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी संतोष बिल्डर गायकवाड, प्रमोद जाधव, संदीप जाधव, दीपक सुखदेव जाधव, रामो शिवाप्पा गायकवाड, श्याम जाधव, नागेश जाधव तसेच पामलोर समाजातील पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button