आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा आरोपीस जामीन मंजूर : मुंबई उच्च न्यायालयात…
सोलापूर दि.
लक्ष्मीबाई नागनाथ कासे वय.36 रा. अशोक नगर विजापूर रोड सोलापूर हिस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिपक नागनाथ बनसोडे वय 35 रा. अशोक नगर विजापूर रोड सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी जामीन मंजूर केला.
अँड. रितेश थोबडे
यात हकीकत अशी की, मयत लक्ष्मीबाई हीने घटनेपूर्वी एक वर्षाआधी आरोपी दिपक बनसोडे यांच्याशी विवाह केला होता. दि.28/11/2022 रोजी लक्ष्मीबाई हि घरी एकटी असताना दिपक हा तिस कामाच्या ठिकाणी येऊन लोकांना काहीही सांगून भांडणे लावतीस काय असे सांगून भांडु लागला व तू मेली तरी चालेल, तु मर असे म्हणून पेट्रोल व डिझेल अंगावर ओतून तु मर असे म्हणाला, त्यानंतर मयताने आता मी मरतेच म्हणून काडीपेटीने स्वतःस पेटवून घेतले, अशा आशयाची फिर्याद मयताने दिनांक 23/11/2022 रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती व दिनांक 9/1/2023 रोजी ती मयत झाली.
त्यावर आरोपीने जामीन मिळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ऍड.रितेश थोबडे यांचेमार्फत जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ऍड. रितेश थोबडे यांनी आपले युक्तीवादात, जरी आत्महत्येचा गुन्हा निष्पन्न होत असला तरी आरोपी हा दोन वर्षापासून कोठडीत असल्याचा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी 25000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
*यात आरोपीतर्फे ऍड.रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ऍड पी. एन. दाभोळकर यांनी काम पाहिले.*