maharashtrapoliticalsocialsolapur

कैकाडी समाजाचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा…

 

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहरातील कैकाडी समाजाने शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना सोमवारी पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या मान्यवरांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मोनिका कोठे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या समाजाच्या मान्यवरांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

यावेळी मोनिका कोठे म्हणाल्या, सोलापूर शहरात कैकाडी समाजातील अनेक मान्यवरांनी शहर विकासाची कामे केली आहेत. तसेच सामाजिक कार्यातही अनेक दशकांपासून कैकाडी समाजाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला आहे. कैकाडी समाजाने देवेंद्र कोठे यांना पाठिंबा दिल्यामुळे देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे, असेही मोनिका कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी समाजाच्या मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व वियोग संघटना सकलेश जाधव, बाबू महादेव गायकवाड, बबलू महादेव गायकवाड, चिरंजीव गायकवाड, कपिल गायकवाड, अर्जुन जाधव आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa