खुर्द आणि सलगर ला अटक २ दिवसांची मिळाली पोलीस कोठडी…

फौजदार चावडी चावडी पोलीस ठाणे हद्दीतील नवीवेस पोलीस चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यानचे मेलगिरी दुकान व वॉकवे फुटवेअर शॉप या दरम्यानचे टी.पी. स्किम नं-२, फायनल प्लॉट नं- ३/ए१ मधील ५९० स्क्वे. फुट जागेचा दि.२८/०७/२०२४ रोजी ००.३० वा. ते ०३.३० वा. चे दरम्यान डॉ. विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजित खुर्द, सुजित कोकरे, व त्याचे इतर ०२ ते ०३ साथीदार यांनी संगनमताने कट रचून घेतला, सदरचा बेकायदेशीर ताबा घेताना, सदर जागेतील पुजा हॉटेल एका जे.सी.बी.चे सहायाने पाडुन, त्या हॉटेल मधील अंदाजे रु.१,५०,०००/- किमतीचे साहित्य चोरून नेले. त्या बाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे, गुन्हा रजि नं. ४७४/२०२४ भा.न्या. सं कलम ६१ (२), ३(५), ३२९ (३), ३३२ (सी), ३३३, ३३१ (३).३३१ (४), ३०५, ३२४ (५), ३५१ (२) (३), ३५२, सह अनुसुचित जाती अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-१९८९ था सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३ (१) (g) अन्वये, गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे तपासा मध्ये, डॉ. विजयकुमार आराध्ये, केदार आराध्ये, अर्जुन सलगर, सुजीत खुर्द, सुजीत कोकरे व त्यांचे इतर ०२ ते ०३ साथीदारांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
त्यामुळे नमुद गुन्ह्याचे तपास अधिकारी श्री. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर यांनी आज रोजी आरोपी १) अर्जुन सिद्राम सलगर, वय-४४ वर्षे, व्यवसाय-व्यापार, रा. घर नं-१०, प्रेरणा सोसायटी, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर २) सुजीत लक्ष्मण कोकरे, वय-२९ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. घर नं-७८, हनुमान मंदिरा जवळ, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर ३) सुजीत दत्तात्रय खुर्द, वय-२८ वर्षे, व्यवसाय-कंन्ट्रक्शन, रा. घर नं-११७/१४९ ए. उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर यांना सदर गुन्ह्यात अटक केली.
त्यानंतर, नमुद तिनही आरोपींना, मा. विशेष न्यायालय, सोलापूर, येथे हजर केले असता, मा. न्यायालयाने त्यांना ०२ दिवस पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.
सुजित खुर्द हा शिवसेना युवा सेना प्रदेश कार्यकारणी सदस्य आहे
यातील, आरोपी नामे १) अर्जुन सिद्राम सलगर, २) सुजीत लक्ष्मण कोकरे, हे सोलापूर शहरातील पोलीस ठाणेचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. तरी पोलीसांकडून नागरिकांना अवाहन करण्यात येत आहे की, वर नमूद आरोपींनी बेकायदेशीररित्या जमिनीचा ताबा घेतला असेल तर याबाबत पोलीसांशी संपर्क साधावा.असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे
सदर गुन्ह्याचा तपास हा, श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे हे सोलापूर शहर हे करीत आहेत.