maharashtrasocialsolapur

महसूल सहाय्यक युसुफ शेख यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची सामाजिक कार्यकर्ते संजोग सुरतगावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार…

सोलापूर

HTML img Tag Simply Easy Learning

तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर येथील युसुफ शेख महसूल सहाय्यक हे शासकीय सेवा बजावत असतांना त्यांच्याकडे प्राप्त महसूल अधिनियम १५५ अन्वये प्राप्त दाखल अर्जावर आपल्या एका खासगी जावेद नामक हस्तकामार्फत सरकारी कार्यालयात बेकायदेशीर रित्या पैशाची मागणी करुनच त्यांचे अर्ज निकाली काढतात. तसेच जो अर्जदार / व्यक्ती त्यांच्या पैशाची मागणी पूर्ण करीत नाही.

त्यांचे अर्ज वेगवेगळी कारणे सांगुन जाणूनबुजून विलंबाने आडवुन ठेवतात. त्याबाबत त्यांच्याकडे प्रलंबित अर्जाबाबत चौकशी केली असता शेख यांनी उडवाउडवीची उत्तरे प्रत्येक वेळी देतात त्यांच्या कार्यालयातील जावेद नामक वावरणाऱ्या हस्तकामार्फत येणाऱ्या अर्जावरच युसुफ शेख कारवाई करतात. व इतर अर्ज प्रलंबित ठेवतात.

उत्तर सोलापूर तालुका परिसरातून ग्रामीण भागातून तसेच शहर भागातून नागरीक, शेतकरी आपल्या कामानिमित्त कार्यालयात येत असतात त्यांची कामे विनाकारण आडवून ठेवणाऱ्या व शेतकरी नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या युसुफ शेख महसूल सहाय्यक यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संजोग सुरतगावकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले .
या मागणीची तात्काळ दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत उपनिवासी जिल्हाधिकारी यांनी लवकरच युसुफ शेख यांच्यावर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल.
हे निवेदन देतेवेळी सोमनाथ राऊत , वैभव गंगणे , विश्वनाथ गायकवाड यांची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button