गणेश डोंगरे ,विनोद भोसलेंचे फौजदार चावडी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन वृत्त सविस्तर…
सोलापूर- खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर युवक काँग्रेस वतीने कॉंग्रेस नेते,लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या केंद्रीय मंत्री रवनीत सिंग
बिट्टू ,राज्यसभा खासदार अनिल बोंडे,आमदार संजय गायकवाड,दिल्लीचे माजी आमदार तरवींदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात *युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे* यांच्या नेतृत्वाखालील ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलीसांनी जबाब नोंदवून घेतला.
गांधी कुटुंबियाने देशासाठी त्याग व बलिदान दिले आहे.देशाविघातक शक्तींनी महात्मा गांधी,इंदिराजी गांधी,राजीवजी गांधी यांचे बळी घेतले आहेत आता पुन्हा गांधी संपवण्याची भाषा केली जात आहे.आमचे नेते राहुल गांधी यांच्या वर आक्षेपार्ह बेताल वक्तव्य करणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी जबाब नोंदवून घेतला.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक विनोद दादा भोसले,प्रदेश सचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस श्रीकांत वाडेकर, सोशल मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला , शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, प्रवक्ते दाऊद नदाफ, शरद गुमटे, महेंद्र शिंदे ,धीरज खंदारे ,सुशीलकुमार म्हेत्रे, विवेक कन्ना,राजेंद्र शिरकुल,आकाश जांभळे, अजिंक्य पाटील,श्रीनिवास परकीपंडला, सुनील सारंगी, उमेर बेनोशिरुर, चंद्रकांत नाईक,श्रीनिवास परकीपंडला,अजय जाधव,अक्षय दिल्लीवाले, शाहू सलगर, यासीन शेख,सूरज शिंदे,युवराज दोडमनी,सूरज कांबळे आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.