दिव्यांगाच्या पाठिंब्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात फारूक शाब्दीचा विजय निश्चित…
दिव्यांग बांधवांचा एआयएमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दीना जाहीर पाठिंबा...
दिव्यांगांच्या व्यथा फारूक शाब्दीनी ऐकून घेतल्या
सोलापूर:सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एआयएमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांचे बळकटीकरण सुरूच आहे.मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहून विरोधकांची भांबेरी उडाली आहे.शुक्रवारी सायंकाळी दिव्यांग संघटनेच्या वतीने एमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.बाबूलाल फणीबंद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील जवळपास एक हजार दिव्यांग बांधवानी पाठिंबा दिला. एआयएमआयएमच्या मध्यवर्ती कार्यालयात दिव्यांग बांधव स्वतः येऊन फारूक शाब्दी यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात दिव्यांग बांधवानी दिलेल्या पाठिंब्यामुळे एमआयएमची ताकद वाढली आहे.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात एआयएमआयएमचे उमेदवार फारूक शाब्दी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.फारूक शाब्दी स्वतः घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत.फारूक शाब्दी समस्या जाणून घेत मतदारांशी संवाद साधत आहेत.एमआयएमचा प्रचारामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.शुक्रवारी सायंकाळी दिव्यांग संघटनेचे बाबूलाल फणीबंद शेकडो दिव्यांग बांधवाना सोबत घेऊन एमआयएम कार्यालयात आले ,आणि जाहीर पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जवळपास एक हजार दिव्यांग बांधव कुटुंबासोबत वास्तव्यास आहे.अत्यंत हलाखीचे आयुष्य जगत आहोत,या राजकारण्यांनी आमची आजतागायत फक्त फसवणूक केली,अशी खंत फारूक शाब्दी समोर व्यक्त केली.एआयएमआयएम पक्ष आणि सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी दिव्यांग बांधवासोबत आहोत अशी ग्वाही फारूक शाब्दी यांनी दिली आहे.फारूक शाब्दी यांनी दिव्यांग बांधवाच्या पाठीवर मायेचा हात फिरवत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वसन दिले.