maharashtrapoliticalsocialsolapur

सासऱ्यांसाठी सुनबाई डॉ. उर्वशी ताई देशमुख निवडणुकीच्या प्रचारात…

आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ सुनबाई सहभागी झाल्याने महिलां वर्गात कुतूहलाने चर्चा सुरू...

सोलापूर

२४८, सोलापूर शहर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय सिद्रामप्पा देशमुख यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुनबाई डॉ. उर्वशी ताई किरण देशमुख यांनी प्रभाग १० व ११ मधील विडी कामगारांशी संवाद साधत त्यांचे अडचणी जाणून घेतल्या व ते सोडविण्याचे आश्र्वस्थ केले. भाजपा व महायुतीने महिलांना सक्षम व सन्मान करणारे अनेक निर्णय घेतलेले आहे. महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना २० नोव्हेंबर रोजी ०२ क्रमांकाचे कमळ समोरील बटण दाबून मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी सर्व विडी कामगार महिलांनी महायुती सरकार व आमदार विजय देशमुख यांनी आमच्या भागात मूलभूत सोयीसुविधेची मोठी विकासकामे केलेली आहेत. लाडली बहीण सारख्या योजना देऊन सन्मान करणाऱ्या भाजपालाच मतदान करणार असे माता – भगिनींनी डॉ. उर्वशी ताईंना अभिवचन दिले.

 

यावेळी महिला मोर्चाचे अध्यक्ष विजया ताई वड्डेपल्ली, माजी नगरसेविका इंदिराताई कुडक्याल, माजी नगरसेविका सोनाली ताई मुटकिरी, संगीता ताई खंदारे, कु. रुचिरा ताई मासम, लता ताई नराल, भाग्यलक्ष्मी ताई म्हंता, शिल्पा ताई देशमुख, प्रतिभा ताई पसारे आदीसह प्रभाग १० व ११ मधील महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa