BIG Breaking:- सोलापुरात सुजित खुर्द सह पाच जणांवर गुन्हा दाखल…खुर्द शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी…
चला इथून निघा इथे कुणाचे काही नाही इथे पाठवल तर दोन्ही पाय तोडीन"*अशी धमकी वारंवार खुर्द व सलगर वाडेकर कुटुंबीयांना देत होते...

सोलापूर
बेकायदेशीर जागा बळकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना प्रदेश कार्यकारणी सदस्य सुजित खुर्द ,खुर्द याच्यासोबत धाराशिव लोकसभा वंचित बहुजन आघाडीचा 2019 सालचा उमेदवार असलेले अर्जुन सलगर यांच्यासह यामध्ये विजयकुमार आराध्ये,
केदार आराध्ये,सुजित कोकरे,यांच्यावर
फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
या थोडक्यात हकीकत अशी की शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत हॉटेल जेसीबीने रातोरात पाडून पावसामुळे झाड पडल्याचे भासवून जागेचा ताबा मिळवल्याचा आरोप खुर्द व अर्जुन सलगर यांच्यावर आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी सुजित खुर्दला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अर्जुन सलगर यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. सलगर यांच्यावर आज ताकत एकूण 14 गुन्हे दाखल असून खंडणी मागणी बेकायदेशीर जागा बळकावणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे सलगर यांच्यावर दाखल आहेत . यापूर्वी सलगर यांना एक वर्ष एम .पी .डी. ए अर्थात झोपडपती दादा म्हणून येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. यातील तक्रारदार रूपाली संदीप वाडेकर यांच्या तक्रारीवरून सुजित खुर्द व अर्जुन सलगर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. *”चला इथून निघा इथे कुणाचे काही नाही इथे पाठवल तर दोन्ही पाय तोडीन”*अशी धमकी वारंवार सुजित खुर्द , अर्जुन सलगर व त्यांचे इतर साथीदार वाडेकर कुटुंबीयांना देत होते. सुजित खुर्दला चौकशी कामी ताब्यात घेण्यात आल्यान राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलाय. सत्ताधारी मुख्यमंत्र्यांच्या पदाधिकाऱ्यांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आता तपास अधिकारी संदीप माणिकराव पाटील हे करत आहेत…