india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

कार्यसम्राट दादांची प्रदेशवर वर्णी निष्ठेचे फळ मिळालेच…

बहुजनांचा बुलंद आवाज नावातच "आनंद" असणाऱ्या दादांना मिळाली प्रदेशवर काम करण्याची सुवर्णसंधी...

सोलापूर

कार्यसम्राट , हृदयसम्राट ,माजी गटनेता ,माजी नगरसेवक असे विविध पदावर आपल्या कार्याच्या माध्यमातून जन – माणसात आपले विशेष स्थान निर्माण करणारे आनंद चंदनशिवे यांची राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः विशेष दखल घेऊन प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. दादांचे विचार ,कार्य ,मंजूर केलेल्या योजना आणि प्रशासनावर असणारा प्रभाव काम करण्याची आणि अधिकाऱ्याकडून काम मार्गी लावण्याची विशेष शैली आनंद दादांमध्येच आहे . प्रभागा पुरता विचार न करता शहराच्या सर्वागीण विकासासाठी दादांचा संघर्ष नेहमी सुरूच असतो. आनंद चंदनशिवे हे नेहमी अठरा पगड जाती – जमातीच्या बांधवांना सोबत घेऊन काम करतात .

पक्षाची बाजू नेहमी ठाम पणे मांडत असतात. आनंद चंदनशिवे यांच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती आनंदानेच परतत असतो . पक्ष कुठलाही अशी प्रत्येका सोबत आनंद चंदनशिवे यांचे मैत्रिपूर्वक संबंध आहेत . सामान्य माणूस असो विद्यार्थी / युवक वर्ग असो,माता – भगिनी असो की युवती ,जेष्ठ नागरिक यांच्या समस्यांचे निराकरण चंदनशिवे नेहमी करत असतात .शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देत असतात . या सर्वांची दखल घेऊन येणाऱ्या विधानसभा निवडणुका ,स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन. वाढीसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे साहेब यांनी आनंद चंदनशिवे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद दिले.त्यांच्या निवडीबद्दलm जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्यासह इतर सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आनंद चंदनशिवे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अजित दादांनी विश्वासाने सोपवलेल्या संधीचे नक्कीच सोने करू पक्ष संघटन वाढीसाठी सर्वोतोपरी
विशेष प्रयत्न करू असे आभार प्रकट प्रतिक्रिया नूतन प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी माध्यमांना दिली..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button