crimeeducationalentertainmentmaharashtrapoliticalsocialsolapurSports

सेंट जोसेफ शाळेत झालेला प्रकार अनावधानाने, पालकांनी तक्रार घेतली मागे…

सोलापूर

सेंट जोसेफ शाळेत गेल्या चार दिवसापूर्वी विद्यार्थी वर्गात सतत बोलत असल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला शिक्षा करण्यात आली, त्यावेळी विद्यार्थ्याला थोडा मार लागला, यावेळी विद्यार्थी च्या पालकांनी तात्काळ शाळेत धाव घेतली, यावेळी आपल्या मुलाला घेऊन पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठून शिक्षका विरुद्ध तक्रार केली होती, या तक्रारीचा निषेध म्हणून सेंट जोसेफ शाळेतील शिक्षकांनी मंगळवारी संप पुकारून काम बंद आंदोलन केले,

दरम्यान मंगळवारी सकाळी विद्यार्थी त्यांचे पालक, सेंट जोसेफ हयस्कुल चे मुख्याध्यापक, तसेच पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली, झालेला प्रकार अनावधानाने झाला असून शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जाते, या शाळेतील विद्यार्थी आज2 मोठया पदावर काम करत आहेत, त्यामुळे चांगले विद्यार्थी घडवण्याचे काम हे शाळेतील शिक्षक करत असतात असे मत शिक्षकांनी व्यक्त केले, तर आम्ही विद्यार्थी, शिक्षक, शाळेतील कर्मचारी आणि पालकांसोबत कायम सोबत राहू असे पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी सांगितले…

तर आमच्या कडून गैर समजुती मधून शाळेतील शिक्षका बद्दल तक्रार केली होती आता गैरसमज दूर झाला असून तक्रार मागे घेत असल्याचे विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले

यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia