बस स्टॅण्डवर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणारी महिला जेरबंद करून चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणून ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने १,८०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत….
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची कामगिरी...

सोलापूर ग्रामीण जिल्हयातील मागील काही दिवसामध्ये एस टी. स्थानकावर प्रवाशाचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्री. सुरेश निंबाळकर यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करून जिल्हयातील महत्वाच्या बस स्थानकावर लक्ष केंद्रीत करुन बस स्टेंड वरील चोरीचे गुन्हे गुन्हे उघडकीस आणणेकामी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी कुडुवाडी ता. माढा येथे हजर असताना सपोनि नागनाथ खुणे यांचे पथकातील पोह आबासाहेब मुंडे यांना गोपनीय बातमी मिळाली की, सोनारी ता. परांडा जि. उस्मानाबाद येथील राहणारी ही वेगवेगळ्या तालुक्यात जावून तेथील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे दागिने व पाकीटे चोरी करण्याच्या सवयीची असून ती सध्या कुडुवाडी बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने व
पाकीटे चोरी करण्यासाठी वावरत असल्याची खात्री बातमी मिळाली. त्याप्रमाणे सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथक कुडुवाडी बस स्थानकावर जावून बातमीप्रमाणे तेथे वावरत
असलेल्या महिलेस पथकातील महिला कर्मचारी मोहिनी भोगे यांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर तिस नाव पत्ता विचारता तिने तिचे नाव उषा अशोक सांगळे, वय ३५ वर्षे, रा. सोनारी ता. परांडा जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगितले. तिस सदर ठिकाणी हजर राहणेबाबत विचारपूस करता तिने उडवाउडवीचे उत्तरे देवू लागली. त्यावरुन तिचेवर अधिक संशय आल्याने तिस विश्वासात घेवून विचारपूस करता तिने सांगितले की, ती सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे दागिने व पाकीटे चोरी करण्याकरीता आल्याचे सांगितले. त्यावरुन तिचेकडे सोलापूर ग्रामीण जिल्हयातील एस टी. स्थानकावर घडलेल्या गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता तिने चालु वर्षात कुईवाडी बस स्थानकावर दोन वेळा व अकलुज बसस्थानक येथे एक वेळा बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेवून प्रवाशांचे दागिने व पाकीटे चोरी केल्याचे कबूल केले. तिचेकडे अधिक तपास करता १) कुडुवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७९/२०२४ भा.द.वि. क. ३७९२) कुडुवाडी पोलीस ठाणे गु.र.नं. ८८/२०२४ भा.द.वि. क. ३७९ व ३) अकलुज पोलीस ठाणे गु.र.नं. २००/२०२४ भा.द.वि. क. ३७९ याप्रमाणे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणून एकूण ४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण १,८०,०००/- किंमतीचा मुददेमाल जप्त केले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म. इसाक मुजावर, सफी नारायण गोलेकर, निलकंठ जाधवर, पोह/आबासाहेब मुंडे, पोह/धनाजी गाडे, मपोह/मोहिनी भोगे, पोकों/सागर ढोरे-पाटील, पोकों/अक्षय डोंगरे, चापोना / समीर शेख, यांनी बजावली आहे.