राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बाळे येथे इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या लाभार्थ्यांना गृहोपयोगी भांड्यांच्या संचचे वाटप….

सोलापूर
रविवारी बाळे येथे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान माजी नगरसेवक तथा गटनेते आनंद चंदनशिवे,महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांच्या शुभहस्ते इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थ्यांना गृहोपयोगी भांड्यांच्या संच चे वाटप करण्यात आले.
तसेच त्या लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हा कार्यक्रम बाळे येथील गुरुकमल मंगल कार्यालय, मारुती गल्ली, येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामदैवत श्री खंडोबा, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज,घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
जय हनुमान तरुण मंडळ व गणेश पुजारी मित्रपरिवार यांच्याकडून व्यासपिठावर उपस्थित सर्वच प्रमुख उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये बाळे भागातील विकास कामा बरोबर शासनाच्या सर्व योजना घरोघरी पोहोचवण्याचे काम या भागाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे व गणेश पुजारी यांनी केले आहे .प्रभागातील व शहरातील सर्व नागरिकांच्या सोबत आहोत आणि राहणार असे वचन गणेश पुजारी यांनी उपस्थित महिला भगिनींना दिले.
येणाऱ्या काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष संगीता ताई जोगधनकर,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान , मा.गटनेते आनंद चंदनशिवे व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार म्हणाले…
मनोगतनंतर प्राथमिक स्वरूपात पाच ते सहा इमारत व बांधकाम कामगार यांना भांडी संच वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ नीता गवळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे,युवा नेते प्रतीक चंदनशिवे, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे, शहर सचिव चंद्रकांत सोनवणे तसेच जय हनुमान तरुण मंडळ कार्यक्रम संयोजन समितीचे महेश गवळी,
भाऊसाहेब सुरवसे ,प्रतिक गणेचारी ,
विशाल करंडे ,औदुंबर तिर्थकर ,गोरख ठाकर,हृदयनाथ (शेरा) मोकाशी, सचिन तिर्थकर, धनंजय तीर्थकर, अजिंक्य पुजारी , सुसेन स्वामी, विनायक दत्तू, नारायण करंडे,
सुरेश हिटनळी,बिभीषण बाकले, मोहन करंडे,ज्योतिर्लिंग करंडे,दशरथ मोरे, सोमनाथ करंडे , अविनाश सुरवसे,शुभम गवळी, स्वप्नील पुजारी ,सुरज पाटील , सुरज जगताप,बळीराम ठाकर , गणेश करंडे धीरज जगताप ,साईप्रसाद करंडे ,शंभूराजे शिरसाठ ,कार्तिक पुजारी ,गणेश लोंढे,वैशाली गणेश पुजारी,निता धनाजी गवळी व योजना दुत बापु करंडे,दत्ता इरपे,राजु जाधव व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व बांधकाम महिला व पुरुष कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.