शिंगाडे, बंडगर, माशाळकर या आरोपींच्या फौजदार चावडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या …

दिनांक २१/०/२०२४ रोजी सायंकाळी ०७.०० वा. च्या सुमारास फिर्यादी नामे काळम्मा ऊर्फ स्नेहा नागेश धर्माधिकारी, वय ५० वर्षे, राहणार- प्लॉट नंबर २, दुसरा मजला, हरि प्रसाद अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, सोलापूर यांचे पती श्री नागेश धर्माधिकारी व मुलगा समर्थ धर्माधिकारी या दोघांना कोणतरी अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी पळवुन घेवुन गेले आहेत म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५७२/२०२४ बी.एन.एस कलम १३७ (२) प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना कोणतीही उपयुक्त माहिती नसतांना, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास देशमुख, सपोनि शंकर धायगुडे, पोह/१२३२ प्रविण चुंगे, पोलीस अंमलदार १४५६ कृष्णा बडुरे, १६१७ दत्ता कोळवले, १६०४ विनोद व्हटकर, १६१२ नितीन जाधव यांनी फिर्यादीस आलेल्या अज्ञात मोबाईल क्रमांकावरून नमुद गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे महेश गजेंद्र शिंगाडे, राहणार मुळेगांव सोलापूर, उमेश अंकुश बंडगर शंकर ऊर्फ दादा अनिल माशाळकर दोघे राहणार इटकळ, तालुका तुळजापूर यांनी फिर्यादी यांचे पती व मुलगा समर्थ यांना त्यांच्याकडील ट्रायबर मोटार कार मध्ये किडनॅप करून शहापूर येथील शेतामध्ये जबर मारहाण करून त्यांनी एक किलो सोन्याची खंडणी मागुन त्यासासाठी सदर पिडित यांना पंढरपूर माळशिरस-फलटन भागातील डोंगराळ व माळ-रानातील भागात त्यांचेकडील कार मध्ये डांबून ठेवून खंडणीची पुर्तता होत नसल्याचे पाहुन दिनांक २३/०९/२०२४ रोजी फिर्यादी यांचे पती व मुलास सोडुन देवुन मोबाईल बंद करून पसार झाले होते.
सदर आरोपीतांचा ठावठिकाणा मिळविण्याच्या दृष्टिने कौशल्यपुर्ण व सातत्याने तपास करून सदरचे आरोपीत हे हाडपसर परिसरात लपून बसले असल्याची माहिती काढुन वर नमुद पथकासह हडपसर येथे जावुन तेथील माळवाडी परिसरातुन सदर गुन्हयातील तिन्ही आरोपीतांना दिनांक २८/०९/२०२४ रोजीचे पहाटे ०६.०० वा. च्या समारास शिताफिने ताब्यात घेवुन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सदरची कामगिरी
सदरची कामगिरी ही मा. श्री. एम राजकुमार साो, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, मा. श्री. अजित बोऱ्हाडे, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय, अति कार्यभार परिमंडळ), मा. श्री विजय कबाडे, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ), मा.श्री. प्रताप पोमण, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. अरविंद माने, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर, श्री. विकास देशमुख, पोलीस निरिक्षक, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोह/१२३२ प्रविण चुंगे, पोलीस अंमलदार १४५६ कृष्णा बडुरे, १६१७ दत्ता कोळवले, १६०४ विनोद व्हटकर, १६१२ नितीन जाधव यांनी केली आहे.