मालक व बापू सोलापूर विमान तळावर उद्घाटनाच्या निमित्ताने आले एकत्र …
बऱ्याच दिवसानंतर दोन्ही देशमुख दिसले एकत्र ...
सोलापूर : प्रतिनिधी
माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख आणि माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली.
याप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, सरचिटणीस विशाल गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी सभागृह नेते संजय कोळी, प्रसाद कुलकर्णी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले. सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र ससी यांनी यावेळी आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामांची माहिती दिली.
———–
कोट
सोलापूरच्या औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय प्रगतीसाठी सोलापूरात कायमस्वरूपी विमानसेवेची आवश्यकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे सोलापुरात विमानसेवा सुरू होत आहे. आता सोलापूरच्या विकासाला कोणीही रोखू शकत नाही. भाजप सोलापुरात विमानसेवा सुरु करु शकत नाही असे चॅलेंज काँग्रेसने दिले होते. पण ४० वर्षे सोलापूरात सत्ता गाजविणाऱ्यांना न जमलेले काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने करून दाखवले आहे.
—- नरेंद्र काळे, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, सोलापूर
————