दादांमुळे मालकांना मिळाला “राज्यमंत्री पदाचा दर्जा”
माजी आमदार राजन पाटील यांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड...
राजन मालकांच्या निवडीबद्दल मोहोळ मध्ये जल्लोषाचे वातावरण...
राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माजी आमदार निष्ठावंत समर्थक जेष्ठ नेते राजन पाटील यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्ष पदी निवड केली. मोहोळ मध्ये नुकतीच जन सन्मान यात्रा पार पडली .मोहोळ मध्ये अजित दादांचे भव्य स्वागत करण्यात आले .जन सन्मान यात्रेस मोहोळकरांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. आम्ही ठरलोया आज succesfull म्हणत बाळराजे व अजिंक्यराणा पाटील यांनी विरोधकांना चेलेंज देत दंड थोपाटले .
माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ चा केलेला विकास दादांवर मालकांची असलेली निष्ठा व पक्ष संघटन वाढीसाठी मालकांचे असलेले महत्वपूर्ण योगदान राजकारणाचा दांडगा अनुभव सहकार क्षेत्रातील राजन मालकांना असणारा कित्येक वर्षांपासूनचा अनुभव या सर्वांची दखल घेत अजित दादांनी राजन मालकांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा समन्वयक यशवंत तात्या माने,जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान व सर्वच फ्रंटल सेलचे सर्व अध्यक्ष – कार्याध्यक्ष तसेच सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दादांमुळे आज राज्याच्या सहकार परिषदेवर अध्यक्ष पदाची संधी मिळाली या संधीचे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी नक्कीच सोने करू.दादांच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी योग्य धोरण आखून विविध योजनांच्या माध्यमातून राज्याचा विकास करू अशी प्रतिक्रिया माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली..
राजन मालक पाटील यांच्यावर राजकीय वर्तुळातील लोकप्रतिनिधी ,विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सोलापूर शहर – जिल्हा वासियांकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय…