९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांच्या उपस्थितीत सोलापूरात ‘भव्य कार्यकर्ता मेळावा…
हिंदुराष्ट्र सेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी व्यापक बैठक संपन्न...
सोलापूर :
हिंदुराष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापुरात बुधवारी सायं. कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली. अशोक चौक येथील चिप्पा भाजी मंडई जवळील लोटस मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुराष्ट्र सेनेची काय भूमिका असेल यावर जोरदार चर्चा करण्यात आली. याविषयी येत्या 9 आक्टोबरला राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी शहर उत्तर, शहर मध्य, शहर दक्षिण अशा तिन्ही मतदार संघातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी जोरदार तयारी सुरु असल्याचे शहरप्रमुख रवि गोणे यांनी सांगितले.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. हिंदुराष्ट्र सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या ताकदीने तयारी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर संघटनेने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे शहरसंघटक आनंद मुसळे यांनी सांगितले. याप्रसंगी विलास पोतू, श्रीकांत सुरवसे, रोहन सोमा, प्रकाश आसादे, अभिजित अरळीकर, सागर कोळी, ओंकार दोडतले, अक्षय पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.