“स्व. मेघराज (विकी) रोडगे स्मृती चषक” ९ वर्षाखालील राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळाडूंचा विक्रमी प्रतिसाद….
सोलापूर
महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व पोलीस कल्याण केंद्राच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमीने *“स्व. मेघराज (विकी) रोडगे स्मृती चषक” ९ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत यजमान सोलापूरसह मुंबई, पुणे, नागपूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, छ. संभाजीनगर आदी जिल्ह्यातील अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अर्जुन सिंग (मुंबई), दर्श पोवार (अ. नगर), राघव पावडे व सर्वज्ञ बालगुडे (पुणे), देवांश डेकटे (ठाणे) व सिद्धांत कोठारी (बार्शी), तसेच मुलींमध्ये मुंबईची आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू त्वीशा जैन, भूमी ढगढगे (नंदुरबार), गिरीशा पै (मुंबई) या मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त २२० नामांकित खेळाडूंनी खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला. यापैकी ४३ बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू आहेत.
सदर स्पर्धा कै. मेघराज (विकी) रोडगे यांच्या स्मरणार्थ नामवंत उद्योजक अरुण दादा रोडगे यांनी प्रायोजित केलेल्या आहेत.
पोलीस कल्याण केंद्र येथील ड्रीम पॅलेस येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने व नामवंत उद्योजक भाऊसाहेब रोडगे यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली. आपले मनोगत व्यक्त करताना राजन माने यांनी खेळात हार-जीत यापेक्षा जिद्द व चिकाटी महत्वाची असते हा संदेश खेळाडूंना देत खेळाडूंनी महाराष्ट्र व देशाचे नाव उज्वल करावे असे सांगितले. तसेच भाऊसाहेब रोडगे यांनीदेखील बुद्धिबळ खेळासाठी सर्वोतपरी मदत करणार असल्याचे सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेने नियुक्त केलेले प्रमुख पंच कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, संघटनेचे सचिव सुमुख गायकवाड, उद्योजक दिनेश जाधव, अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील, सुभाष उपासे, वरिष्ठ राष्टीय पंच उदय वगरे, शशिकांत मक्तेदार, युवराज पोगुल, प्रशांत पिसे, रोहिणी तुम्मा, जयश्री कोंडा, विजय पंगुडवाले, यश इंगळे, प्रज्वल कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमुख गायकवाड व सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. या स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात स्पर्धा संपन्न होणार असुन मुले व मुलींच्या आकर्षक लढती उपस्थितांना पहावयास मिळत आहेत. तसेच संभाजी नगरचा पाच वर्षीय गिरीक पाटील, पुण्याचा सहा वर्षीय शौर्य मक्तेदार व सोलापूरचा विवेक स्वामी हे बाल खेळाडू आकर्षक खेळ करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे..
राज्यस्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करताना सहाय्यक पोलीस उपायुक्त राजन माने व नामवंत उद्योजक भाऊसाहेब रोडगे. यावेळी महेश धाराशिवकर, सुमुख गायकवाड,दिनेश जाधव, अतुल कुलकर्णी, संतोष पाटील, उदय वगरे, युवराज पोगुल, रोहिणी तुम्मा, जयश्री कोंडा, विजय पंगुडवाले, यश इंगळे.