मोहम्मद पैगंबरांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामगिरी महाराजांचा चार दिवसांत अटक करा…
अन्यथा जेलभरो आंदोलन;फारूक शाब्दी व इम्तियाज जलीलांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना इशारा...

रामगिरी महाराजांवर कारवाईचे दिले आश्वसन
मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या बाबत रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते.रामगिरी महाराजांच्या विरोधात ऑल इंडिया मजलीस ए ईत्तीहाद उल मुस्लिमीन पक्षा तर्फे मोठा भव्य मोर्चा आणि तिरंगा रॅली काढण्यात आली होती.महाराष्ट्र राज्याचे एआयएमआयएम प्रमुख इम्तियाज जलील यांनी राज्यातील सर्व मुस्लिम बांधवाना 23 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होऊन तिरंगा रॅलीत सहभागी होऊन रामगिरीचा विरोध करण्याचे आवाहन केले होते.सोलापूर शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी सोलापुरातील तमाम मुस्लिम बांधवाना आवाहन केले होते.फारूक शाब्दीच्या आवाहनाला भरघोस पाठिंबा देत,सोलापुरातील मुस्लिम बांधव रामगिरी महाराजांच्या विरोधात असलेल्या मोर्चा आणि तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.सोलापुरातून शेकडो वाहनांचा ताफा हजारो कार्यकर्ते आणि मुस्लिम बांधव सोबत घेऊन फारूक शाब्दी औरंगाबाद येथे गेले.औरंगाबादहुन हजारो वाहने मुंबईकडे तिरंगा रॅली घेऊन मुंबईला जाऊन आले.मुंबईच्या वेशीवरच पोलीस प्रशासनाने गुडघे टेकले आणि इम्तियाज जलील व फारूक शाब्दी यांना रामगिरी महाराजांना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.आठ दिवसांत कारवाई न झाल्यास एआयएमआयएम राज्यभर जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
लोकशाही मार्गाने बोलण्याचा सर्वांना अधिकार आहे.परंतु कोणत्याही धर्माचा अपमान होईल असे वक्तव्य केल्यास संविधानानुसार कारवाई केली जाते.रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.
एआयएमआयएम असो किंवा मुस्लिम धर्मीय जनता असेल,मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात एक शब्दही विरोधात सहन करू शकत नाही.त्यामुळे इम्तियाज जलील,फारूक शाब्दी आणि इतर पदाधिकारी हे लाखोंच्या संख्येने मुंबईकडे 22 सप्टेंबर रोजी रवाना झाले होते.हातात संविधानाची प्रत घेऊन ,मुख्यमंत्र्यांना भेट देऊ असे इम्तियाज जलील आणि फारूक शाब्दी यांनी घोषणा केली होती.सोमवारी दुपार पासून माध्यमांमधून बातम्या आणि गर्दी पाहून राज्य सरकार पूर्णपणे घाबरले होते.मुंबईच्या वेशीवर मुंबई पोलीस आयुक्त येऊन इम्तियाज जलील यांना भेटून कारवाई करण्याचर आश्वासन दिले.चार दिवसांत रामगिरी महाराजांवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांच्या वतीने आश्वसन देण्यात आले.
फारूक शाब्दीच्या आवाहनाला सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला.हजारो कार्यकर्ते मुंबईला जाण्यासाठी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते.तिरंगा रॅलीत सहभागी झालेल्या बांधवाचे फारूक शाब्दी यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.यापुढे कोणत्याही महाराजांनी किंवा धर्मगुरूनी कोणत्याही समाजाचा अपमान करू नये,अन्यथा अशा तिरंगा रॅलीतुन धडा शिकवण्यात येईल अशा इशारा फारूक शाब्दी यांनी दिला आहे.मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात एक शब्दही मुस्लिम व्यक्त अजिबात सहन करणार नाही असेही फारूक शाब्दी यांनी सांगितले आहे.