सेंट जोसेफ हायस्कूलचे शालेय फुटबॉल स्पर्धेत घवघवीत यश…
.सोलापूर –
महाराष्ट्र शासनाच्या शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूल ने घवघवीत यश संपादन केले. 17 वर्षाखालील मुले आणि 14 वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले तर 17 वर्षाखालील मुली आणि 14 वर्षाखालील मुले उपविजेते ठरले.
वालचंद कॉलेजच्या मैदानावर झालेले या स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूल पहिल्यापासूनच आघाडीवर होती. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात शांती इंग्लिश स्कूलचा पेनल्टी मध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. कर्णधार वसंत वाघमोडे याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर सामन्यात 1-0 ने आघाडीवर असलेल्या सेंट जोसेफ हायस्कूल ने शेवटपर्यंत सामना रंगतदार केला. परंतु सामन्याला काही मिनिटे शिल्लक असताना शांती इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी फ्री किकवर गोल करत सामना बरोबरीत आणला. त्यानंतर पेनल्टी मध्ये 3-0 फरकाने सेंट जो सपने अंतिम सामना जिंकला
गोलकी अथर्व बोरकर याने शानदार कामगिरी केली.
त्या अगोदर बटरफ्लाय इंग्लिश स्कूलचा 5-0, राज मेमोरियल स्कूलचा 4-0,आय एम एस चा 2-0, आणि हरिभाई हायस्कूलला 2-0 या फरकाने सेंट जोसेफ स्कूलने हरवले.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार स्वरा पेंटर हिच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले.
14 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार जॉन पिल्ले तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार नंदिनी पवार हीच्य नेतृत्वाखाली उपविजेतेपद पटकावले. खेळाडूंना
क्रीडा शिक्षक सनी भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल हायस्कूलचे फादर आनंद गायकवाड यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
……………………………..
कर्णधार वसंत वाघमोडे चे सर्वाधिक गोल
सेंट जोसेफ चा कर्णधार वसंत वाघमोडे यांनी सर्वाधिक 11 गोल केले. बटरफ्लाय विरुद्ध 5, राज मेमोरियल 2, आय एम एस 1, हरीभाई 1, शांत इंग्लिश मीडियम विरोधात 1 आणि पेनल्टी 1 असे 2 गोल केले.
……………………….
क्रिडाशिक्षक सनी भोसले यांचे अनमोल मार्गदर्शन
सेंट जोसेफ हायस्कूलचे क्रीडाशिक्षक सनी भोसले यांनी गेल्या तीन वर्षात सर्वच खेळांमध्ये वैयक्तिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांना प्रोस्ताहित केले. विशेषतः फुटबॉल मध्ये हायस्कूलची कामगिरी चमकदार राहिली आहे. प्रत्येक खेळाडूंवर वैयक्तिक लक्ष, अचूक मार्गदर्शन आणि खेळावरील प्रेम यामुळे खेळाडूंची कामगिरी उंचावत आहे.
……………………………