पार्क चौपाटी वरील विना परवाना थाटलेले मनोरंजनात्मक खेळणे महापालिकेने केले जप्त…
सोलापूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले पार्क चौपाटी वरील अतिक्रमण ....
सोलापूर
सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण धारकांवर कारवाईचा बडगा उचलला जातोय.शहर पोलिस व सोलापूर महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई केली जातेय . गणपती विसर्जना नंतर नवरात्र उत्सवा पूर्वीच शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विना परवाना थाटण्यात आलेले अतिक्रमण सोलापूर महानगर पालिका विभागाने काढून टाकले .
७० फूट रोड,घोंगडे वस्ती, महावीर चौक ते विमान तळ,कर्णिक नगर आणि आज पार्क चौपाटी वरील अतिक्रमण हटवण्यात आले.पार्क चौपाटी वर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी अतिक्रमण करून विविध साहित्य रस्त्यावरच थाटण्यात आले होते .यामध्ये डम्पिंग , घसर गुंडी ,हेलीकॉप्टर,आणि खेळण्यातील चारचाकी वाहन { छोट्या कार } ,मिकिमाऊस JCB च्या साहाय्याने उचलून ते साहित्य जप्त करण्यात आले.
अतिक्रमण धारकांना ४०० रू.पासून ते ८००० रू.पर्यंत दंड करण्यात येतोय .आता हे साहित्य जप्त केली यापुढे जप्त न करता हे साहित्य उद्ध्वस्त करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण अधिकारी हेमंत डोंगरे यांनी सांगितलं . बऱ्याच दिवसानंतर इथले अतिक्रमण हटविण्यात आल्याने पार्क चौपाटीने मोकळा श्वास घेतल्याचे दृश्य प्रथमदर्शनी दिसून आले.
ही कारवाई सोलापूर महानगर पालिका आयुक्त डॉ शीतल तेली – उगले यांच्या आदेशान्वये अतिक्रमण पथकाचे अधिकारी हेमंत डोंगरे ,पोलीस निरीक्षक रवींद्र भंडारे ,पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव कोळेकर ,यांच्या नेतृत्वात Asi झेंडे ,हवालदार बायस,टोणपे ,भोसले महिला पोलीस शेख, गुंड यांनी या कारवाईसाठी अथक परिश्रम घेतले….