वादग्रस्त मंत्री तानाजी सावंत व डीन संजीव ठाकुर यांची चौकशी न झाल्यास 02 ओक्टोंबर रोजी शासकीय हॉस्पिटलच्या आवारात महात्मा गांधीच्या वेशभूषेत गांधीगिरी आंदोलन करणार :- योगेश { YP}पवार
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेच्या रक्त तपासणी टेंडरमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत व अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्या डमी लॅब...

सोलापूर –
आरोग्यमंत्री तानाजी सावंत व डीन संजीव ठाकुर यांनी संगनमताने डीन यांचे हस्तक शेख याचेमार्फत डमी लॅब काढून स्वत:च्या फायद्यासाठी अनट्रेंड व अपात्र लोकांना महात्मा ज्योतिबा योजनेअंतर्गत पेशंटच्या विविध प्रकारच्या 155 रक्त तपासणी करण्याचे टेंडर दिल्याचा आरोप छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी पत्रकार परिषेदेत केला. या टेंडरमुळे सर्वसामान्य पेशंटच्या जीवित्तास धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे रक्त तपासणी टेंडर रद्द न केल्यास 02 ओक्टोंबर रोजी शासकीय हॉस्पिटलच्या आवारात महात्मा गांधीच्या वेशभूषेत गांधीगिरी आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार हॉस्पिटलचे डीन संजीव ठाकुर यांनी दिनांक 02/08/2024 रोजी 09 नियम व अटीसह एक प्रसिद्धी पत्रक काढले. त्या नियम व अटीनुसार तानाजी सावंत व संजीव ठाकूर यांच्या जवळच्या व्यक्तींना टेंडर देणे शक्य नव्हते. त्यामुळे तानाजी सावंत यांचे सांगणेवरून डीन ठाकुर यांनी त्यांचे हस्तक व्यक्तींना टेंडर देणे सोईचे व्हावे व ते पात्र व्हावेत, यासाठी दि. 09/08/2024 रोजी पुन्हा एकदा 13 नियम व अटीसह एक प्रसिद्धी पत्रक काढले. परंतु, ते पत्रक कोणत्याही दैनिकांत प्रसिध्दीस न देता हॉस्पिटलमध्ये लावले. दि. 02/08/2024 रोजीच्या पत्रकांत बदल का करण्यात आला, याचा कोणताही खुलासा डीन ठाकुर यांनी केलेला नाही.
वास्तविक पाहता, तानाजी सावंत व डीन ठाकुर यांनी शेख नामक हस्तकामार्फत त्याच्या जवळच्या सद्दाम (हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक्स) व अल्ताफ मुल्ला (ए.एच.एम पॅंथोलॉजी) यांना टेंडर देण्यासाठीच नियम व अटीमध्ये चेंजेस केले. आणि हेल्थ फर्स्ट डायग्नोस्टिक्स यांची स्वत:ची रक्त तपासणी लॅब नाही. ते फक्त पोस्टमन सारखे सिव्हिल हॉस्पिटलमधून पेशंटचे रक्त घेवून 2-3 कि.मी लांब त्रयस्थ लॅबकडे देवून व तिथून तपासणी करून हॉस्पिटलकडे देण्याचे काम करणार आहे, असे असतांनाही त्या लॅबला 77 तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले, तर 4-5 कि.मी लांब ए.एच.एम पॅंथोलॉजी यांना 72 तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले, त्याचेकडेही अत्यावश्यक सुविधा देणार्या व आवश्यक त्या तपासण्या करणार्या सर्व मशीनरी नाहीत. या लॅबच्या टेक्निशिएनचे नियमाप्रमाणे पॅरामेडिकल कोन्सिलकडे नोंदणी नाही. तसेच या दोन्हीही लॅब कायमच बंद असतात. असे असतांनाही तानाजी सावंत व संजीव ठाकुर यांनी त्यांना टेंडर दिले. याबाबत गोपनीय माहिती घेतली असता तानाजी सावंत व डीन ठाकुर यांनी संगनमताने ठाकुर यांचे हस्तक शेख याचेमार्फत डमी लॅब काढून त्यांचे फायद्यासाठी अपात्र लोकांना टेंडर दिल्याची माहिती मिळाली. अश्या अनट्रेंड व चुकीच्या लोकांना टेंडर दिल्यामुळे सर्वसामान्य पेशंटच्या जीवित्तास धोका निर्माण होवू शकतो. त्यामुळे रक्त तपासणी टेंडर त्वरित रद्द करावे.
या टेंडरमध्ये सहभागी डॉ. पोतदार लॅबोरेटरीज व ओम श्री लॅबोरेटरीज यांचेकडे सर्व अत्यावश्यक सुविधा देणार्या मशीनरी असून त्यांच्याकडे स्वत:च्या लॅब असतांना सुध्दा त्यांना अनुक्रमे 05 व 01 रक्त तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले. या दोन्ही लॅबकडे 155 रक्त तपासण्या करणारी मिशनरी व तज्ञ टेक्निशिएन असून त्या दोन्ही लॅब हॉस्पिटलच्या आसपास आहेत. असे असतांनाही या पात्र लॅबना फक्त 6 रक्त तपासण्या करण्याचे टेंडर देण्यात आले. त्यामुळे सदरच्या सदोष टेंडर प्रक्रियेची सखोल चौकशी करून अपात्र व्यक्तींचे टेंडर रद्द करावे. टेंडर रद्द न झाल्यास व वादग्रस्त मंत्री तानाजी सावंत व डीन संजीव ठाकुर यांची चौकशी न झाल्यास राष्ट्रीय छावा संघटनेच्यावतीने दिनांक 02 ओक्टोंबर 2024 रोजी शासकीय हॉस्पिटलच्या आवारात महात्मा गांधीच्या वेशभूषेत गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार, संजय पारवे, रतिकांत पाटील व मल्लिनाथ बिराजदार हे उपस्थित होते.