सागर बंगल्यावर कैकाडी समाजाची महत्त्वाची बैठक संदीप जाधव यांच्या नेतृत्वात संपन्न….
कैकाडी समाजावर लादलेले क्षेत्र बंधन त्वरित हटवा...
सोलापूर : कैकाडी समाज हा
महाराष्ट्रात एकाच वेळी दोन प्रवर्गात मोडतो. विदर्भात हा समाज अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये गणला जातो, तर उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर विभाग आणि मुंबई परिसरात तो भटक्या विमुक्त जमातीमध्ये येतो. एकाच राज्यामध्ये असलेल्या या दोन भिन्न विभागणीमुळे कैकाडी समाजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.जो पर्यंत क्षेञीय बंधन हटवले जात नाही, तोपर्यंत समाजाला सरसकट अनुसूचित जातीच्या सवलती लागू करा,अशी मागणी राज्यातील कैकाडी समाज प्रतिनिधींनी केली.
कैकाडी समाजाच्या प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी मुंबई येथे केंद्रीय मंञी भुपेंद्रजी यादव, मा. विदेश मंञी व्ही. मुरलीधरनजी, ओबीसी मोर्चा राष्टिय महामंञी मा. खासदार मा. संगमलाल जी गुप्ता, भाजपा प्रदेश महामंत्री श्री विजय चौधरी, ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री संजयजी गाते, माजी आमदार नरेंद्रजी पावर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप(आबा) जाधव यांनी ही बैठक आयोजित करुन यशस्वीरीत्या पार पाडली.
राज्यातील कैकाडी समाजावर असललेले क्षेत्रीय बंधन रद्द करा,कैकाडी समाज आर्थिक विकास महामंडळ जाहीर करा अशी मागणी यावेळी समाजबांधवांनी केली. केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव यांनी समाजाचे निवेदन स्वीकारुन लवकरात लवकर कैकाडी समाजाचे क्षेञिय बंधन हटवुन दोन वर्गात विभागलेल्या समाजाचे एका वर्गात वर्गीकरण करुन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे जाहीर केले.
संजय मेढे,देवा गायकवाड, संजय गायकवाड, रोहिदास जाधव,धनंजय जाधव, कुंदन गायकवाड राज्य भरातील शेकडो प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.