maharashtrapoliticalsocialsolapur

पक्षा विरुद्ध भूमिका घेतल्याने माजी उपमहापौर राजेश काळे यांच्यासह माजी नगरसेवकांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस….

सोलापूर 

दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय जनता पार्टीकडे सोमेश वैद्य यांनी इच्छुक उमेदवार म्हणून लेखी अर्ज पक्षाकडे सादर केला व त्यांना उमेदवारी द्यावी म्हणून त्यांच्या समर्थनार्थ माजी नगरसेवक पक्षनेता श्रीनिवास करली, माजी नगरसेवक, राजश्री चव्हाण, वरलक्ष्मी पुरुड, राजश्री पाटील-बिराजदार, जुगुनबाई आंबेवाले यांनी लेखी शिफारस केले होती . याबाबत पक्ष संघटनेला न विचारता त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केले, त्याबाबत त्यांना पक्ष संघटनेकडून कारणे दाखवा नोटीस देऊन 3 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. अशाच प्रकारे माजी उपमहापौर राजेश काळे हे वारंवार प्रिंट मिडिया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून पक्ष विरोधी आणि पक्षाच्या लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात वक्तव्य केलेले आहे आणि करत आहे .त्यांनाही अश्याच प्रकारची नोटीस देऊन 3 दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे. खुलासा आल्यानंतर प्रदेश स्तरांवरील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माध्यमांना दिली…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia