देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था युवक शाखेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण…
सोलापूर,
दि. २१: दि. २१ सप्टेंबर रोजी सोलापूर येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था युवक शाखेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. श्री सरस्वती विद्या मंदिर येथील इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त नव्या शतकातील भारत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता.
सदर स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून क्षितिजा गाताडे यांचे सहकार्य लाभले. उद्योजक दत्ता आण्णा सुरवसे यांच्यातर्फे यशस्वी विध्यार्थ्यांना आणि प्रमुख पाहुणे यांना भेटवस्तू देण्यात आली. पारितोषिक प्राप्त विध्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरस्वती मंदिर शाळेच्या सचिवा प्रीती चिलजवार या प्रमुख पाहुणे आणि डॉ. श्रीकांत येळेगावकर अध्यक्ष म्हणून लाभले.
दे. ऋ. ब्रा. संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांना सर्व उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रवींद्र नाशिककर आणि हेमा चिंचोळकर तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रवींद्र नाशिककर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी केले आणि सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी आभार मानले.
——————-
सोलापूर, दि. २१: दि. २१ सप्टेंबर रोजी सोलापूर येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था युवक शाखेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले. श्री सरस्वती विद्या मंदिर येथील इयत्ता दहावीच्या विध्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त नव्या शतकातील भारत या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून क्षितिजा गाताडे यांचे सहकार्य लाभले. उद्योजक दत्ता आण्णा सुरवसे यांच्यातर्फे यशस्वी विध्यार्थ्यांना आणि प्रमुख पाहुणे यांना भेटवस्तू देण्यात आली. पारितोषिक प्राप्त विध्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी सरस्वती मंदिर शाळेच्या सचिवा प्रीती चिलजवार या प्रमुख पाहुणे आणि डॉ. श्रीकांत येळेगावकर अध्यक्ष म्हणून लाभले. दे. ऋ. ब्रा. संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांना सर्व उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रवींद्र नाशिककर आणि हेमा चिंचोळकर तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रवींद्र नाशिककर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी यांनी केले आणि सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिका नीता येरमाळकर यांनी आभार मानले.