सोलापुरात होणार पहिले वसुंधरा संमेलन…
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 26 आणि 27 सप्टेंबर रोजी उपक्रम; तज्ञांचे मार्गदर्शन, रोपवाटिकांचे प्रदर्शन...
सोलापूर :सोलापूर महापालिका माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पहिले वसुंधरा संमेलन सोलापुरात आयोजित करण्यात आले आहेत. 26 आणि 27 सप्टेंबर 2024 असे दोन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर आणि सोलापूर महापालिका परिसरात हे वसुंधरा संमेलन होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत वृक्षदिंडी निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वृक्ष दिंडीला सुरुवात होईल. सिद्धेश्वर मंदिर मार्गे ज्ञान प्रबोधिनी शाळा, डफरीन चौक आणि महापालिका परिसर असा वृक्षदिंडीचा मार्ग असेल. विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी या वृक्षदिंडीत सहभागी होणार आहेत.
महापालिका इंद्रभवन परिसरात रोपवाटिकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. वृक्षदिंडीनंतर या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात वसुंधरा संमेलनाचे उद्घाटन सत्र होईल. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक बी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 12 यावेळेत ज्येष्ठ सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे हे सापांविषयीच्या रंजक गोष्टी आपल्या सादरीकरण आणि मार्गदर्शनातून सांगणार आहे. जुन्नर वन विभागातील वनरक्षक, पर्यावरण अभ्यासक रमेश खरमाळे हे पर्यावरण संवर्धनातील माझा सहभाग या विषयावर दुपारी 12 ते 1 यावेळेत सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी १:३० ते 2:30 या वेळेत ज्येष्ठ सर्पतज्ञ, पर्यावरण अभ्यासक निलीमकुमार खैरे हे कचरा पुनर्वापर या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील. जल अभ्यासक रजनीश जोशी हे जनजागृती या विषयावर दुपारी 2:30 ते 3.00 यावेळेत मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात दुपारी 3.00 ते 3:30 या वेळेत पुण्याच्या मिशन शुन्य कचरा अभियानाच्या प्रमुख अर्चना मोरे या मिशन शून्य कचरा या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी 3:30 ते 4:00 श्रीमती गार्गी गिध, ग्रीन फाउंडेशन, मुंबई यांचे विघटनशील प्लास्टिक विषयी मार्गदर्शन करणार आहेत. तदनंतर 4 ते 5:30 या वेळेत सोलापूर शहरातील पर्यावरणप्रेमी संस्था पर्यावरण संवर्धनातील सहभाग या विषयावर सादरीकरण करणार आहेत.
समारोपाच्या सत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर शहरात पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने उपक्रम राबवणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत, पर्यावरण अधिकारी श्री. अक्षय मोरे, श्री. स्वप्निल सोलनकर, उद्यान अधीक्षक श्री. जगदाळे तसेच सोलापुर शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी संस्था सदरचे वसुंधरा संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
“तरीसोलापुरात होणार पहिले वसुंधरा संमेलन
—
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 26 आणि 27 सप्टेंबर रोजी उपक्रम; तज्ञांचे मार्गदर्शन, रोपवाटिकांचे प्रदर्शन
—
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर महापालिका माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पहिले वसुंधरा संमेलन सोलापुरात आयोजित करण्यात आले आहेत. 26 आणि 27 सप्टेंबर 2024 असे दोन दिवस हुतात्मा स्मृती मंदिर आणि सोलापूर महापालिका परिसरात हे वसुंधरा संमेलन होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वसुंधरा संमेलनाच्या निमित्ताने 26 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत वृक्षदिंडी निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वृक्ष दिंडीला सुरुवात होईल. सिद्धेश्वर मंदिर मार्गे ज्ञान प्रबोधिनी शाळा, डफरीन चौक आणि महापालिका परिसर असा वृक्षदिंडीचा मार्ग असेल. विविध शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी या वृक्षदिंडीत सहभागी होणार आहेत.
महापालिका इंद्रभवन परिसरात रोपवाटिकांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. वृक्षदिंडीनंतर या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
शुक्रवार दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात वसुंधरा संमेलनाचे उद्घाटन सत्र होईल. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक बी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 12 यावेळेत ज्येष्ठ सर्पतज्ञ निलीमकुमार खैरे हे सापांविषयीच्या रंजक गोष्टी आपल्या सादरीकरण आणि मार्गदर्शनातून सांगणार आहे. जुन्नर वन विभागातील वनरक्षक, पर्यावरण अभ्यासक रमेश खरमाळे हे पर्यावरण संवर्धनातील माझा सहभाग या विषयावर दुपारी 12 ते 1 यावेळेत सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात दुपारी १:३० ते 2:30 या वेळेत ज्येष्ठ सर्पतज्ञ, पर्यावरण अभ्यासक निलीमकुमार खैरे हे कचरा पुनर्वापर या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील. जल अभ्यासक रजनीश जोशी हे जनजागृती या विषयावर दुपारी 2:30 ते 3.00 यावेळेत मार्गदर्शन करणार आहेत.
संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात दुपारी 3.00 ते 3:30 या वेळेत पुण्याच्या मिशन शुन्य कचरा अभियानाच्या प्रमुख अर्चना मोरे या मिशन शून्य कचरा या विषयावर सादरीकरण आणि मार्गदर्शन करतील. त्यानंतर दुपारी 3:30 ते 4:00 श्रीमती गार्गी गिध, ग्रीन फाउंडेशन, मुंबई यांचे विघटनशील प्लास्टिक विषयी मार्गदर्शन करणार आहेत. तदनंतर 4 ते 5:30 या वेळेत सोलापूर शहरातील पर्यावरणप्रेमी संस्था पर्यावरण संवर्धनातील सहभाग या विषयावर सादरीकरण करणार आहेत.
समारोपाच्या सत्रात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोलापूर शहरात पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने उपक्रम राबवणाऱ्या पर्यावरणप्रेमी संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत, पर्यावरण अधिकारी श्री. अक्षय मोरे, श्री. स्वप्निल सोलनकर, उद्यान अधीक्षक श्री. किरण जगदाळे तसेच सोलापुर शहरातील सर्व पर्यावरण प्रेमी संस्था सदरचे वसुंधरा संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
“तरी राज्यामध्ये प्रशासन स्तरावर पहिलेच पर्यावरण संवर्धना विषयीचे संमेलन होत असुन शहरातील सर्व पर्यावरणप्रेमिनी सदर संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे” पर्यावरण संवर्धना विषयीचे संमेलन होत असुन शहरातील सर्व पर्यावरणप्रेमिनी सदर संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे”