india- worldmaharashtrapoliticalsocialsolapur

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी विनोद धर्मा भोसले यांची निवड…

सोलापूर 

माजी केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. सुशीलकुमारजी शिंदे  व खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथलाजी यांच्या मान्यतेनुसार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. नाना पटोले यांच्या सूचनेवरून श्री. विनोद धर्मा भोसले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
विनोद भोसले हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे  व खासदार प्राणितीताई शिंदे , माजी मंत्री आ. विश्वजित कदम यांचे निकटवर्तीय व एकनिष्ठ म्हणून परिचित आहेत. ते गेले अनेक वर्षे काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. काँग्रेस चे दिवंगत नेते धर्मा भोसले यांचे ते चिरंजीव असून ते स्वतः उच्चशिक्षित(C A) असून ते उत्तम संघटक म्हणून शहरात परिचित आहेत.
काँग्रेस पक्षा व्यतिरिक्त सोलापूरच्या विविध क्रीडा, सांस्कृतिक व कला क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवजन्मोत्सव व नवरात्र महोत्सवात शहरात कार्यरत आहेत.
विनोद भोसले हे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे तसेच सोलापूर महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. ते मनमिळाऊ व सर्वांना बरोबर घेऊन  जाणारे नेते आहेत. त्यांच्या निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री  सुशीलकुमारजी शिंदे ,खासदार प्रणिती शिंदे,माजी मंत्री मा.विश्वजीत दादा कदम,माजी आमदार दिलीपराव माने, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa