सोलापुरात सकाळपासून एकूण २९ .४४ % मतदान शांततेत संपन्न…

सोलापूर
सोलापुरात आज मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न होत असून त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने कडेकोट असा बंदोबस्त शहरात सर्वत्र लावण्यात आला आहे.अती संवेदनशील भागात पोलिसांची करडी नजर असल्याचे प्रथम दर्शनी चित्र पाहावयास मिळत आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांनी शहरात शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष बंदोबस्त शहरात तैनात केला आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,पोलीस आयुक्त एम राजकुमार,पालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.
सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघातील ३७३८ मतदान केंद्रावर प्रशासनाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे .यामध्ये एकूणच २३०५ मतदान केंद्रावर वेब कास्टिंग ची स्वतंत्र सुविधा करण्यात आली आहे . जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नियोजन भवन येथील सभागृहात मतदान केंद्रावर होत असलेल्या वेब कास्टिंग ची पाहणी केली .तसेच मतदान केंद्रावर पार पाडत असलेल्या मतदान प्रक्रियेची ही माहिती घेतली.
सकाळच्या सत्रात सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत पुरुष एकूण ५७९८० तर महिला ५२४०९ आणि इतर ३ असे एकूणच ११०३९२ इतके मतदान पार पडले आहे. प्रत्येक घडामोडींवर पोलिसांची विशेष करडी नजर असल्याने मतदान शांतता व सुव्यवस्थेत पार पडत आहे. युवक वर्ग ही मोठ्या संख्येने मतदानास बाहेर पडला आहे..
हे मतदान प्रक्रिया संध्याकाळी ६ वा.पर्यंत सुरू राहणार असून मतदारांनी मोठ्या संख्येने विविध मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे…..