
सोलापूर
दि. 17/08/2024:-
यामधील हकीकत अशी की फिर्यादी व आरोपींच्या वाहिनीचे प्रेम संबंध होते. त्यातूनच आरोपींच्या भावाने त्याच्या पत्नी विरुद्ध महिला तक्रार निवारण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे तक्रार केली होती. त्यासंबंधी फिर्यादी यांना फोन करून महिला तक्रार निवारण केंद्राने बोलावले असता फिर्यादी त्याच्या गाडीतून येत असताना बाळे कॉर्नर जवळ आल्यावर त्याने गाडी थांबवून पत्ता विचारण्यासाठी खाली उतरला असता मागून आरोपींनी डोक्यात व हातावर लाकडी बांबू मारून फिर्यादी यांना गंभीर जखमी केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.द.वी कलम 326, 324, 504,34 प्रमाणे फिर्याद दाखल केली. संशयावरून 3 आरोपींना 13/08/2024 रोजी अटक करून मे. न्यायालयात हजर केले होते.
तद्नंतर आरोपींनी ॲड. सौरभ जगताप यांच्या मार्फत मे. न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. सदरकामी यात आरोपींच्या वकिलांनी आरोपींचा जामीन मंजूर करणेकमी युक्तिवाद केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून मे.न्यायालयाने दी.17/08/2024 रोजी तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला.
यात आरोपीतर्फे ॲड. सौरभ जगताप व ॲड शिवा औटगी यांनी काम पाहिले.