अल्पसंख्यांकांच्या पाठीशी सह्याद्री सारखा उभा असणारा नेता फक्त अजितदादा – ईद्रीसभाई नाईकवाडी प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस….
अल्पसंख्यांक विभाग सोलापूर शहर आढावा बैठकीस शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याचा ठराव एकमताने मंजूर....

सोलापूर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण राज्यभर अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी आणि अजितदादांनी अल्पसंख्याकां साठी घेतलेले निर्णय आणि कामाची माहीती अल्पसंख्यांक समाजात पोहचविण्यासाठीच राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रीसभाई नाईकवाडी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण मराठवाडा कार्याध्यक्ष सिद्दीकी हे देखील या दौऱ्यात सहभागी आहेत. राष्ट्रवादी भवन कार्यालयात याच अनुषंगाने सोलापूर शहर अल्पसंख्यांक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. सोलापूर शहर राष्ट्रवादी भवन येथे अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रीसभाई नाईकवाडी यांचे स्वागत ढोल ताशे हलग्याच्या कडकडाटात फटाक्यांच्या आतषबाजी करीत पुष्पहार घालून मोठ्या उत्साहात जल्लोषात अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी केले .
बैठकीत संजीव मोरे यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि सोलापूर अल्पसंख्यांक विभागात ख्रिश्चन समाज बांधव मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे सांगितल..
यानंतर सर्व प्रमुख उपस्थिती पाहुण्यांचे स्वागत शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले
प्रास्ताविकेत अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख यांनी संघटनात्मक कामाचा आढावा मांडला शहर कार्यकारिणी नेमलेली असून ती सक्रिय कार्य करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उपक्रम अतिशय उत्साहात आम्हीच करीत असून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष ईद्रीसभाई नाईकवाडी प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करत राहू असा शब्द देत सोलापूर शहरात अल्पसंख्यांक समाजाची संख्या मोठी असून शहर मध्य विधानसभेत ती जास्त आहे.
त्यामुळेच शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादीला सोडवून घ्यावा असा ठराव मांडला त्याला अनुमोदन कार्याध्यक्ष संजीव मोरे यांनी दिले हा ठराव टाळ्याच्या कडकडाटात एकमताने मंजूर करून त्याची प्रत अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष इद्रीसभाई याच्याकडे सोपविण्यात आली..
यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रिया पार पडल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस नाईकवाडी यांच्याहस्ते मुसेब एजाज शेख – मध्य विधानसभा अध्यक्ष
नवाज जावीद शेख ( हुंडेकरी )
उत्तर विधानसभा अध्यक्ष
तौफिक अब्दुल सलाम उस्ताद – शहर जिल्हा सरचिटणीस
मुसेब गफ्फार मुजावर
प्रभाग 25 अध्यक्ष यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सोलापूर शहर कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी आपल्या मनोगतात सोलापुर शहर अल्पसंख्यांक विभागाच्या कामाचे कौतुक केले तर विधानसभा मध्य आपल्याला का? सोडवून घ्यावा यावर प्रकाश टाकला
अल्पसंख्यांक प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची माहीती दिली
जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी कसे आहेत यांचे उदाहरण देऊन सांगितले दादा हा शब्दाचा पक्का आहे दादा हा बहुजन समाजाला सोबत घेऊन सर्वसमावेशक नेता असून आपण सर्वजण दादांचे हात बळकट करण्यासाठी दादाच्या पाठीशी उभे राहून अल्पसंख्यांक समाजाचा विकास अजितदादाच्या माध्यमातून करावा असे आवाहन करीत सोलापूर शहर मध्य विधानसभा ही राष्ट्रवादीला सोडवून घेण्यासाठी प्रदेश पातळीवरील ईद्रीसभाई आपण अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.
अध्यक्षीय भाषणात ईद्रीसभाई यांनी सोलापूर अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमिर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे यांच्या कामाचे कौतुक करीत अल्पसंख्यांक विभागाच्या संघटनात्मक बांधणीवर समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची आपली मागणी राज्यस्तरीय बैठकीत आग्रहाने मांडणार असल्याचे सांगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या कार्याचा लेखाजोखा ईद्रीसभाई यांनी संदर्भ सहीत मांडला अल्पसंख्यांक समाजासाठी घेतलेला मार्टीचा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याच बरोबर मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला भरीव नीधीची तरतूद करण्यात आली राज्यात जोपर्यंत अजितदादा सत्तेवर आहेत तोपर्यंत अल्पसंख्यांक समाजावर अन्याय होणार नाही यांची खात्री व्यक्त करीत प्रत्येक वेळेस दादा अल्पसंख्यांक समाजासाठी धाऊन येतो दादासोबतच अल्पसंख्यांक समाजात भवितव्य जोडले गेले असुन दादा हा सह्याद्री सारखा आपल्या पाठीशी उभा आहे त्यांना आपण साथ द्यावी असे आवाहन केले .
या बैठकीचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले तर आभार शहर दक्षिण अल्पसंख्यांक अध्यक्ष अशपाक कुरेशी यांनी मानले..
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान प्रदेश कार्याध्यक्ष वसिम बुऱ्हाण मुबिन सिद्धकी, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, प्रदेश युवक सरचिटणीस अल्पसंख्यांक खलिल शेख सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमीर शेख, कार्याध्यक्ष संजीव मोरे, अल्पसंख्यांक शहर दक्षिण अध्यक्ष अशपाक कुरेशी,कार्याध्यक्ष मुईज मुल्ला, अल्पसंख्यांक शहर दक्षिण विधानसभा संघटक जहीर शेख, अल्पसंख्यांक विभाग शहर उपाध्यक्ष समदानी मत्तेखाने, महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम, डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने, डॉक्टर महेश वसगडेकर, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख,OBC सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद,OBC सेल कार्याध्यक्ष बाबू पटेल , दक्षिण विधानसभा महिला कार्याध्यक्ष कांचन पवार , सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख अध्यक्ष बसवराज कोळी , डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र गालियाल, शहर सरचिटणीस शामराव गांगर्डे , वाहतूक सेलचे आयुब शेख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..