अजित दादा पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत बारामती विधानसभा निरिक्षक सुरेश पालवे यांचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांच्या चरणी साकडे…
बारामती विधानसभा निरिक्षक सुरेश पालवे यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराजांची महाआरती संपन्न ...
सोलापूर
सोलापूर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले अजित पवार महायुतीत गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्याकडून केला जात आहे अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. याच पार्श्वभूमीवर पवित्र श्रावण निमित्ताने सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती विधानसभा निरीक्षक सुरेश पालवे यांच्या हस्ते अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी सिद्धरामेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन साकडे घालून महाआरती केली.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव, शिवराज जाधव,ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रांतिक सदस्य महेश निकंबे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,किरण शिंदे, शहर मध्य राष्ट्रवादी कार्याध्यक्ष शोभा गायकवाड,शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, सरोजनी जाधव,संगीता गायकवाड, संगीता बिराजदार, माणिक कांबळे, हुलगप्पा शासम, वसंत कांबळे, महादेव राठोड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालवे म्हणाले की अजित पवार हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही सर्वसामान्यांची भावना आहे आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरवू या संकल्पसह घड्याळ तेच वेळ नवी आणि अजितपर्व यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत .
आज ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन साकडं घालत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे विराजमान व्हावेत हे सर्वसाधारण कार्यकर्त्यांची आणि राष्ट्रवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची भावना असल्याचे ते म्हणाले. यावेळी बारामती विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सुरेश पालवे किसन जाधव, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अन्नछत्रांमध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला .