बंदलगी येथील बंधारा दुरूस्तीसाठी 4 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर…
आ. सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांना यश......

सोलापूर :
बंदलगी (ता. द. सोलापूर) येथील सीना नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरूस्तीसाठी शासनाकडून सुमारे 4 कोटी 23 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्याला यश आले आहे.
बंदलगी बंधार्यातून व लोखंडी दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. पाण्याचा साठा होत नसल्याने शेतकरी वर्ग सिंचनापासून वंचित राहत आहे. याबाबत परिसरातील शेतकर्यांनी आमदार देशमुख यांना ही बाब सांगितली होती. आमदार देशमुख यांनी स्वतः जाऊन बंधार्याची पहाणी केली होती. बंधार्याचे स्लॅब खराब झाले असून येथील सळईही उघडे पडल्याचे दिसून आले. त्यानंतर आमदार देशमुख यांनी शासनाकडे या बंधार्याच्या दुरूस्तीसाठी निधी मिळवण्याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर आमदार देशमुख यांच्या प्रयत्नाला यश आले असून शासनाने या बंधार्याच्या दुरूस्तीसाठी 4 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यातून लवकरच बंधार्याच्या मजबुती करणाचे काम सुरू होणार आहे.