उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुहीनशेट्टी बंडा प्रशालेत वह्या वाटप…
आयुष्यात गुरुजनांना कधीच विसरायचं नाही : देवेंद्र कोठे...

सोलापूर :
आई-वडिलांसोबतच आपल्या शाळेतील शिक्षकांसोबत आपण बराच वेळ घालवतो. त्यांच्या संस्कारामुळेच आपण घडतो. आयुष्यात गुरुजनांना कधीच विसरायचं नाही. वह्यावाटप उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही खारीचा वाटा उचलत आहोत. सर्वांच्या सदिच्छामुळे भविष्यात अधिक चांगले काम करण्याची संधी मिळेल, अशी आशा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यावतीने माधव नगर परिसरातील श्री कुरहीनशेट्टी ज्ञाती संस्था संचलित श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला या ठिकाणी 54 हजार वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. कोठे बोलत होते.
युवा नेते देवेंद्र कोठे म्हणाले, ‘श्री कुरहीनशेट्टी समाज एकसंग आहे. श्री कुरुहीनशेट्टी ज्ञाती संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी, धार्मिक उपक्रमांसोबतच गोरगरिबांच्या मुलांना विद्यादानाचे देण्याचे महत्त्वाचा कार्य होत आहे. सोलापूर हे बहुभाषिकांचं शहर आहे. या ठिकाणी सर्व जाती, धर्माचे लोक एकत्र आनंदाने राहत आहेत. श्री कुरुहीनशेट्टी ज्ञाती संस्थेचे काम प्रेरणादायी आहे. विणकर समाजातील मुले शिकली पाहिजेत या हेतूने समाजाच्या ज्येष्ठांनी एकत्र येऊन या शाळेची सुरुवात केली होती. भविष्यात विद्यार्थ्यांनी मोठे झाल्यानंतर समाजातल्या गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेला आणि समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने मदतीसाठी पुढे यावे.’
या कार्यक्रमाप्रसंगी श्री कुरुहीनशेट्टी ज्ञाती संस्था अध्यक्ष के.सी.मादगुंडी, विश्वस्त गिरीष कामूर्ती, अमर मासा, इरेश गडगी, कृष्णा कनकी, श्री कुरुहीनशेट्टी ज्ञाती संस्था संचलित श्रीमती नरसम्मा बसप्पा बंडा प्रशाला, श्रीमती सरस्वती तिमप्पा मराठी शाळा शालेय समिती चेअरमन प्रभाकर अण्णा गोरंटी, खजिनदार श्रीनिवास जोगी, सदस्य जनार्दन गडगी, अंबादास कनकी, सिद्राम तट्टे, राजू कनकी, नरसिंग सरला
शिक्षण संकुलातील मुख्याध्यापक एम.डी. बिराजदार, बसवराज बडोरे, निर्मला तट्टे, शेख मॅडम आदींसह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते जक्कप्पा कांबळे, रमेश यन्नम, शहर चिटणीस नागेश सरगम,
सुनील पाताळे, दत्तात्रय पोसा राजशेखर येमुल, विश्वनाथ प्याटी, सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, नरेश पतंगे, विजय महिंद्रकर, मुजावर सर, सुधाकर वडनाल, सत्यनारायण कुरापाटी प्रभाकर राजुल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
—
चौकट –
मोठी संधी मिळाल्यास अधिकाधिक चांगले काम करणार
आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकीतून साजरा झाला पाहिजे हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विचार आहे. त्यामुळेच आम्ही स्व. विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 54 हजार वह्या वाटपाचा उपक्रम करत आहोत. माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांच्याकडून मला सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात आपल्या सर्वांच्या सदिच्छामुळे मोठी राजकीय संधी मिळाल्यास अधिकाधिक चांगले काम करणार आहे.
– देवेंद्र कोठे,
युवा नेते, भारतीय जनता पार्टी