अ. भा. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारणीत सोलापूरच्या तिघांचा समावेश…

सोलापूर
अ. भा. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारणीत सोलापूरच्या तिघांचा समावेश
सोलापूर, दि. १४ ऑगस्ट
(शहर प्रतिनिधी) :- अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. यामध्ये नगरचे महेंद्र गंधे हे अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. तसेच या मंडळावर सोलापूरच्या तिघांची बिनविरोध निवड झाली. यामध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तैजक संस्था सोलापूरचे उपाध्यक्ष दत्ता आराध्ये, रोहिणीताई तडवळकर आणि मंगळवेढ्याचे वासुदेव उर्फ नाना जोशी यांचा समावेश आहे.
अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा ११ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दादर परिसरातील मध्यवर्ती मंडळाच्या सभागृहात उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली. त्या सभेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. राजेश मुधोळकर यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर नूतन अध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन कार्यकारी मंडळाची सभा झाली त्यामध्ये कार्याध्यक्षपदी प्रभाकर कुलकर्णी कोषाध्यक्षपदी विनोद मांडके तर वेगवेगळ्या विभागातून चार सचिव निवडण्यात आले त्यामध्ये मुंबई आणि परिसरातून मिलिंद सरदेशमुख, आनंद कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र परिसरातून सोलापूरच्या रोहिणी तळवळकर तर उत्तर महाराष्ट्रातून गणेश वढवेकर यांची सचिव म्हणून निवड झाली.
या शिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून दत्ता आराध्ये (सोलापूर), वासुदेव तथा नाना जोशी (मंगळवेढा), जे.के. जोशी, (डोंबिवली), विनोद देशमुख, (नांदेड), डॉ. हरी महाशब्दे (अकोला), रामचंद्र दिघवडेकर (मुलुंड), विजय चाव्हरे, (कल्याण), मधुकर कुलकर्णी (लातूर), गिरीश कुलकर्णी (मुंबई), रमेश पाटील (मुंबई), मंदार तगारे, (नाशिक), सुनील पारखी, अनिल पानसे, अश्विनकुमार उपाध्ये, जयंत देशपांडे, केतकी कुलकर्णी (सर्व पुणे), अभय जोशी, विनायक जोशी,(दोघेही बेळगावी), नितीन शहापूरकर (बडोदा, गुजरात), अनिकेत अष्टेकर (कोल्हापूर) यांचा समावेश करण्यात आला.
—————-