
सोलापूर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री .संतोष भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विजयनगर आकाशवाणी केंद्राच्या पुढे सुशील बालकाश्रम येथील मुलांची डॉक्टर सेल सोलापूर शहर विभागाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, व पौष्टिक आहाराची वाटप कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर उपस्थित होत्या.
व्यासपीठावर डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप माने, कार्याध्यक्ष डॉ.महेश वसगडेकर, उपाध्यक्ष निलेश डॉ. निलेश खंडागळे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला प्रस्ताविकेत डॉक्टर सेल विभागाचे अध्यक्ष डॉ. संदीप माने यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत मायेचे छत्र हरपलेल्या मुलांना सामाजिक हातभार लाभावा आपणही समाजाचे देणे लागतो हा माणुसकीचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर सेल विभागाने आदरणीय संतोष भाऊंच्या वाढदिवसानिमित्त सुट्ट्या अशा उपक्रमाचं विशेष आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला सुशील बालकाश्रम मधील मुलांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला.
मान्यवरांच्या हस्ते मुलांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद प्रथमदर्शनी पाहायला मिळाला. हा कार्यक्रम आयोजित करणारे डॉक्टर संदीप माने व त्यांचे इतर पदाधिकारी यांचा आदर्श प्रत्येक राजकीय पक्षाने विविध सामाजिक संघटनाने घ्यावा असे आवाहन सुशील बालकाश्रम संस्थेच्या व्यवस्थापिका विना देवकते यांनी केल.
मनोगत पर भाषणात प्रमुख अतिथी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी वायपट खर्चाला फाटा
देत मायेचे छत्र हरपलेल्या मुलांना माणुसकीच्या नात्याने हा उपक्रम हाती घेऊन डॉक्टर सेल विभागाने भाऊंच्या दिर्घायुष्यासाठी आशीर्वाद घेतलेत. असे मनोगत व्यक्त करत डॉक्टर संदीप माने व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुशील बालकाश्रम येथील कपिल देवकते व प्रीती देवकते यांनी अथक परिश्रम घेतले…