शहर मध्यवर फडकणार शिवसेनेचाच भगवा…
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे : ५०० बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्यांचे वाटप...

सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अनेक वर्षांपासून शहर मध्ये मतदारसंघात शिवसैनिकांची मजबूत फळी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शहर मध्य विधानसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल, असे प्रतिपादन शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या आणि शहर मध्य विधानसभेच्या निरीक्षक प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केले.
युवा सेनेच्यावतीने युवा सेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांनी आयोजित केलेला शहर मध्य मतदारसंघाचा मेळावा उपलप मंगल कार्यालय येथे झाला. यावेळी शहर मध्यचे शिवसेना प्रभारी आमदार विजय चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, मनीष काळजे, युवासेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, संयोजक प्रियदर्शन साठे, सागर शितोळे, शहर प्रमुख मनोज शेजवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या मेळाव्यात विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. यावेळी तब्बल ५०० बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मोफत बांधकाम कामगार नोंदणी, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना यांसारख्या अनेक योजनांची मोफत नोंदणीही या वेळेस युवासेनेच्यावतीने करण्यात आली.
याप्रसंगी अर्जुन शिवसिंगवाले, उपजिल्हप्रमुख दिपक पाटील, नेहाल शिवसिंगवाले, सचिन गुंटुनोलू, सोनू कांबळे, भैय्यासाहेब माने तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.