प्रवेश प्रक्रिया साठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची भारती विद्यापीठाकडून अडवणूक राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन…
निवेदनावर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचा सकारात्मक प्रतिसाद...

सोलापूर
दिनांक ८ जुलै २०२४ रोजी शासन निर्णयात उच्च व तंत्र शिक्षण विभाग व्यवसायिक शिक्षणामध्ये मुलींना प्रवेश शुल्क मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला . याबाबत शासन स्तरावरून महाविद्यालयासाठी अधिकृत GR ही निघाला .असे असताना भारती विद्यापीठ सारख्या विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी मुलींकडून जबरदस्तीने प्रवेश शुल्क घेत आहेत. याची तक्रार सोमवारी राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी च्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मा. मोनिका सिंह यांच्याकडे करण्यात आली.याला प्रतिसाद देत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी तातडीने या बाबत शहर – जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांना आदेश काढू या आदेशानंतर ही विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार संबंधित महाविद्यालयांनी केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले .
त्याच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची संकेत स्थळाची लिंक तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्याने फॉर्म भरण्यास अडचणी होत असल्याने ही समस्या लवकर मार्गी लावावी व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभार्थी महिलांना घेता यावा अशी ही मागणी यावेळी केली.
हे निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक नारायण माशाळकर ,महिला प्रदेश उपाध्यक्ष सायरा शेख ,युवती अध्यक्ष किरण माशाळकर , महिला शहर सरचिटणीस भाग्यश्री राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, सोशल मीडिया शहर – जिल्हाध्यक्ष वैभव गंगणे ,युवती उपाध्यक्ष प्रियांका गोरंटी,तेजस चौधरी,गणेश गवळी ,कुमार चांचलानी यांची उपस्थिती होती….