crimemaharashtrapoliticalsocialsolapur
सोलापूर – अक्कलकोट रोडवरील SVCS शाळेसमोर पेट्रोलचा टँकर झाला पलटी घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार…
घटनेनंतर वाहनचालक फरार...

सोलापूर
मंगळवारी सोलापूर अक्कलकोट रोड येथिल SVCS शाळे समोर पेट्रोलचा टँकर भर रस्त्यात पलटी झाला.त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात पेट्रोल सांडले.हा टँकर सोलापूरहून गुलबर्गा कडे जाताना अपघात झाला. टँकर चालकाने
भरधाव वेगाने वाहन चालवल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच पथक घटनास्थळी दाखल झालं.
या अपघातामध्ये कोणतेही जीवित हानी झाली नसली तरी घटनेनंतर या रोडवरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी खोळंबलेली वाहतूक पूर्ववत करत वाहनधारकांना दिलासा दिला.
या घटनेनंतर संबंधित वाहन चालकांन घटनास्थळावरून पळ काढला. भर रस्त्यात पलटी झालेला टँकर पोलिसांनी बाजूला केला.