व्यसनी मुलाचा खून वडिलांसह चौघे निर्दोष:- ॲड. धनंजय माने…

सोलापूर
अक्कलकोट रोड वरील जामदार वस्ती समोर दिनांक २८/०१/२०२० रोजी संपुर्ण घराला त्रास देणारा व्यसनी मुलगा शैलेश याचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपावरून मयताचा वडील सुरेश सिद्धलिंग घोंगडे रा. मार्डी ता. उत्तर सोलापूर यांच्यासह चौघांविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होवुन न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची हकीकत अशी की मयत शैलेश (३१) यास दारु व गांजा हे व्यसन होते. तो वडिलांना पैशाची मागणी करुन मारहाण करीत होता. दारुच्या नशेत आई, भाऊ व भावजय यांनादेखील मारहाण करीत होता. घरातील सामानाची नासधुस करत होता. त्यामुळे घरातील सर्वजण वैतागले होते. त्याच्या या त्रासामुळे वैतागुन जाऊन वडिलांनी साथीदाराकरवी त्याचा गळा दाबुन खुन केला असे सरकारपक्षाचे म्हणणे होते. वळसंग पोलीस स्टेशनला याबाबत दाखल झालेल्या गुन्हयाचा तपास पुर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे, ॲड. प्रणित जाधव यांनी काम पाहिले.



