solapur

नोकराच्या आत्महत्या प्रकरणी व्यापाऱ्यास अटकपूर्व जामीन:- ॲड. शशी कुलकर्णी…

 

सोलापूर

 

येथील रहिवासी विरेश संगापुरे यांच्या आत्महत्येप्रकरणी सोलापूर येथील सोन्याचे व्यापारी श्री. अजित मल्लिनाथ किवडे, वय- ३१ रा. उत्तर कसबा, गवंडी गल्ली, सोलापूर यास सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.

 

 

 

 

यात हकीकत अशी की, वीरेश संगप्पा संगापुरे रा. उत्तर कसबा, कुंभार वाडा, सोलापूर हा मागील तीन वर्षापासून सोन्याचे व्यापारी श्री. अजित किवडे यांच्या ज्वेलर्स दुकानात काम करत होता, त्यास पगारामध्ये जास्त रक्कम गेली या कारणावरून दि. १३/०९/२०२६ रोजी शिवीगाळ झाली व त्याच कारणास्तव दिनांक १५/०९/२०२६ रोजी मारहाण केली त्यामुळे वीरेश याने घरात गळफास घेऊन दिनांक १८/०९/२०२६ रोजी आत्महत्या केली, मृत वीरेश चे वडील संगप्पा संगापुरे यांचे फिर्यादी वरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून व्यापारी मालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

 

 

 

त्यामध्ये सदर व्यापाऱ्यास अटकेची शक्यता निर्माण झाली होती, त्यामुळे त्यांनी ॲड. शशी कुलकर्णी मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, त्यास सरकार पक्षाने जोरदार विरोध केला. त्यामध्ये व्यापारी अजित किवडे यांच्यातर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की, मयत नोकर याची दुकान मालकाविरुद्ध कधीही कोणत्याही प्रकारची तक्रार नव्हती, मृत वीरेशच्या आत्महत्येस व्यापारी मालक कारणीभूत आहे याबाबतचा चिठ्ठी वा इतर कोणताही कागदोपत्री पुरावा नाही, यातील दुकान मालकाने त्याला कधीही त्रास दिल नाही, या उलट वेळोवेळी मदत केली व आधार दिला आहे. त्याबाबत ॲड. शशी कुलकर्णी यांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग असलेले पेन ड्राईव्ह व व्हाट्सअप मेसेज च्या प्रती न्यायालयात दाखल केल्या, यामध्ये दोघांमध्ये चांगले संबंध होते हे दिसून येत आहे. सदर प्रकरणात आरोपीची पोलीस कोठडीतील चौकशी ची कोणतीही आवश्यकता नाही, आरोपी हा प्रतिष्ठित नागरिक असून तपासात सहकार्य करत आहे .

 

 

 

या आधारावर अटकपूर्व जामीन द्यावा अशी मागणी केली. त्यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सोलापूर येथील सत्र न्यायालयाने सदर व्यापाऱ्यास दर सोमवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर अटकपूर्व जमीन मंजूर केला.
सदर प्रकरणात व्यापाऱ्यातर्फे ॲड. शशी कुलकर्णी, ॲड.प्रसाद अग्निहोत्री, ॲड. रेवती कोरे यांनी तर सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार यांनी काम पाहिले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button