solapur

सोलापूर ….. तुला मनपा बांधकांम विभागावर भरोसा नाय का ?

 

सोलापूर

 

सोलापुरातील नामवंत शैक्षणिक संस्था सरस्वती मंदीर प्रशाला हि हेरिटेज वास्तु भूईकोट किल्ला 300 वर्षांपेक्षा जास्त काळापासून पुरातत्व ऐतीहासीक कलात्मक महत्व असलेला भुईकोट किल्ला अस्तीत्वात असून किल्याच्या अतिशय जवळ असलेली सरस्वती मंदीर प्रशालेने पुरातत्व विभागाचे सर्व नियम पायदळी तुडवत ( पुरातत्व स्थळे, आणि अवषेश कायदा १९५८ च्या पुरातत्व अधिनियम २०१० या द्वारे कायदे लागू असताना कोणतेही बांधकांम, जुन्या इमारतीची दुरुस्ती, गिलावा करणे, बदल करणे ) बांधकाम केले. वास्तविक पहाता पूर्व परवानगी घेवूनच करणे क्रम प्राप्त असताना पुरातत्व कायदा अधिनियम २०१० च्या नुसार बंदी असून तसे केल्यास दखल पात्र गुन्हा असून या बेकायदेशीर बांधकामासाठी जबाबदार अँड रघूनाथ दामले व ॲड पांडूरंग देखमुख यांना जबाबदार धरत गुन्हे दाखल केले आहे. या बेकायदेशीर व अनाधिकृत बांधकांमा बाबत पुरातत्व विभागाने संस्थेला व महापालिका आयुक्त यांना २७/४/२०२२ व १८/७/२२ नोटिशी द्वारे बांधकांम अनाधिकृत असल्याचे ठरवून ते पाडण्याचे आदेश महापालिकेला दिले.

 

 

 

 

यावर कोणतेही ठोस कार्यवाही झाली नाही म्हणून या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विष्णू आयवळे यांनी २१/८/२०२५ रोजी माहिती अधिकारा खाली रितसर अर्ज करून कारवाईची माहिती मागीतली मात्र महापालिकेनी न पुरवल्या मुळे विष्णु आयवळे यांनी प्रथम अपिलीय अधिकाऱ्या कडे धाव घेतली तिथे ही सुनावणी न झाल्याने अखेर राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपील दाखल केले.

 

 

 

त्यावर राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाचे आयुक्त मकरंद रानडे यांनी म न पा शिक्षण विभागाचे जनमाहिती अधिकारी मा शितोळे यांना १० हजार रूपयाचा दंड का ठोठवण्यास येवू नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावून 15 दिवसाच्या आत अर्जदाराला संपूर्ण माहिती देण्याचे आदेश पारित केले. यावर महापालिका ( बांधकाम विभाग) काय निर्णय घेते या कडे सर्व शिक्षण क्षेत्रात कुतुहलाने विचारले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button