पत्रकारांच्या गृह प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार : महापौर कोंड्याल
गृहप्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून महापौरांनी दिली ग्वाही

.
सोलापूर :
शहरात देशातील ऐतिहासिक असा पहिलाच गृहप्रकल्प सोलापुरात केवळ पत्रकारांसाठी उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून म्हाडा अंतर्गत हा प्रकल्प साकारला जात आहे. अनेक वर्षाची पत्रकारांची स्वप्नपूर्ती होत आहे. यामुळे या गृह प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, अशी ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिली.
विजापूर रस्त्यावरील पत्रकार भवनालगत उभारण्यात येत असलेल्या पत्रकारांच्या गृह प्रकल्पास आज दुपारी महापौर विनायक कोंड्याल यांनी भेट दिली. प्रकल्पातील सर्व इमारती व सोयी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापालिकेचे उपअभियंता रौफ सरकाजी , उप अभियंता इदायत मुजावर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष उमेश कदम, रामेश्वर विभुते, बाळकृष्ण दोड्डी , विकास कस्तुरे, विक्रांत कालेकर , संगमेश जेऊरे, आमसिद्ध व्हनकोरे , अमोल कांबळे, योगेश कल्याणकर, कादर शेख, राजू बंडगर, महादेव मादगुंडी , भास्कर अल्ली आदींसह पत्रकार उपस्थित होते. याप्रसंगी दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, पत्रकार विनोद कामतकर यांच्या हस्ते महापौर कोंड्याल व अधिकाऱ्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला.

महापौर कोंड्याल पुढे म्हणाले, पत्रकारांच्या गृह प्रकल्पाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. सर्वांना सुख-सोयी मिळाव्यात अशा दृष्टिकोनातून हा प्रकल्प साकारला जात आहे. पत्रकारांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न साकारत आहे. पुणे-मुंबईमध्ये आपलं घर असायला पाहिजे अशा पद्धतीचं काही लोकांचे स्वप्न असतात तरीदेखील सोलापूरमध्ये आपल्या माय-माती सोलापूरमध्ये अतिशय हक्काचं, स्वतःचं हक्काचं घर आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साकार होत आहे. याचा मनस्वी आनंद होत आहे, असे ते म्हणाले.
—–



