मर्डर प्रकरणातील आरोपीला फौजदार चावडी पोलिसांनी अटक; पिस्तूल जप्त

सोलापूर
फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कामगिरी करत मर्डर प्रकरणातील आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक पिस्तूल हस्तगत केले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (परिमंडळ) प्रथम यावलकर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१ अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राजळे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) विकास देशमुख यांच्या सूचनेनुसार, सपोनि संजय क्षीरसागर, पोसई श्रीकांत पाटोळे, पोसई सतीश बाबणे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
फौजदार चावडी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ४५ मीटर रोडवर एक इसम हातामध्ये पिस्तूल घेऊन फिरत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथकासह ४५ मीटर रोड ते जानकर नगरकडे जाणाऱ्या रोडवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी संशयित इसम फिरताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल आढळून आले. आरोपीचे नाव उर्फान ऊर्फ पाप्या मुनीर गोलंदाज (वय २६ वर्षे), रा. गवळी वस्ती, देगाव नाका, लक्ष्मी पेठ, सोलापूर असे आहे.
आरोपीकडून पिस्तूल जप्त करून त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही गुन्हे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उर्फान ऊर्फ पाप्या मुनीर गोलंदाज याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये विजापूर नाका पोलीस ठाणे तसेच जेलरोड पोलीस ठाणे येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक विकास देशमुख, सपोनि संजय क्षीरसागर, पोसई श्रीकांत पाटोळे, पोसई सतीश बाबणे यांच्यासह पोलीस अंमलदारांनी ही कामगिरी बजावली..



