वडदेगाव खुन खटला ! हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला…

सोलापूर
दत्ता नागनाथ बागल रा. वडदेगाव तालुका मोहोळ यास जीवे ठार मारल्या प्रकरणी व एकास गंभीर जखमी केल्या प्रकरणी हॉटेल मालक मंगेश सुरेश डोंगरे व त्याचा कामगार समर्थ संजय जगताप यांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश यू एल जोशी यांनी फेटाळला.
यात हकीकत आशिकी, दिनांक 25 4 26 रोजी यातील मयत दत्ता व हॉटेल मालक मंगेश यांचेत पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. तो वाद मिटविण्यासाठी दिनांक 27 4 2026 वडगाव ते औंढी येथील कॅनाल जवळ मयत दत्ता व त्याचे पुतणे व इतर आले होते. त्यावेळी आरोपी मंगेश व समर्थ देखील त्या ठिकाणी आले. त्यावेळी आरोपी मंगेश याने मयतास शिवीगाळ करून सोबत आणलेल्या चाकूने दत्ता यास पोटात छातीवर भोसकले त्यामुळे दत्ता हा गंभीर जखमी होऊन खाली पडला त्यावेळी सोडवण्यासाठी समाधान जाधव हा मध्ये गेला असता त्यासही मंगेशी आणि चाकूने गंभीर जखमी केले. तर दुसरा आरोपी समर्थ याने शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद मयताचा पुतण्या विठ्ठल नरसु बागल याने कामती पोलीस ठाण्यात दिली होती.
जामीन मिळण्यासाठी आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळी पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरून व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांवरून आरोपींविरुद्ध सकृत दर्शनी असा ठोस पुरावा असल्याचा युक्तिवाद मांडला त्यावरून न्यायाधीशांनी आरोपी हॉटेल मालक व नौकराचा जामीन अर्ज फेटाळला.
यात सरकार तर्फे ॲड आनंद गोरे तर मूळ फिर्यादी तर्फे ॲड. मिलिंद थोबडे, ॲड.विनोद सूर्यवंशी, ॲड संगम मोरे, ॲड ओंकार भुसे यांनी काम पाहिले.



